Hardik Pandya Asia Cup 2022 Latest Marathi Update SAAM TV
Sports

Hardik Pandya: दुखापतीनंतर कमबॅक, आता मॅचविनर; हार्डहिटर हार्दिक पंड्यानं स्वतःला इतकं कसं बदललं?

पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पंड्यानं तुफानी फलंदाजी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Nandkumar Joshi

Asia Cup India vs Pakistan T20: आशिया चषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज टी २० सामन्यात भारतानं जबरदस्त विजय मिळवला. गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल करणाऱ्या मॅचविनर हार्दिक पंड्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दुखापतीनंतर टीम इंडियाबाहेर गेलेला हार्दिक पंड्या संघात परतल्यानंतर इतका कसा बदलला? त्यानं स्वतःला कसं बदललं? याबाबत स्वतः टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं उत्तर दिलं.

पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारताचा हार्डहिटर हार्दिक पंड्याचीच (Hardik Pandya) जोरदार चर्चा आहे. अखेरच्या षटकांत जवळपास २०० च्या स्ट्राइकनं तुफानी फलंदाजी करून भारताला विजय मिळवून देणाऱ्या हार्दिकचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दुखापतीतून सावरल्यानंतर टीम इंडियात (Team India) कमबॅक आणि त्यानंतर आता मॅचविनर असा त्याचा प्रवास अचंबित करणारा आहे. हार्दिकनं स्वतःला इतकं कसं बदललं याचं उत्तर स्वतः रोहित शर्मा याने दिलं आहे.

हार्दिक पंड्यानं टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर तो आता स्वतःचा खेळ चांगल्या तऱ्हेने समजू लागला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी याबाबतीत स्वतःच्या कामगिरीवर त्याला पूर्ण विश्वास आहे, असे रोहित शर्मा म्हणाला.

रोहित शर्मा म्हणाला की, हार्दिक पंड्या असा खेळाडू आहे की वेगवेगळ्या परिस्थितीत त्याला कसं खेळायचं आहे, हे तो उत्तमरित्या जाणतो. ज्यावेळी हार्दिकने पुनरागमन केलं, त्यानंतर त्याची कामगिरी उत्तम होत आहे. ज्यावेळी तो संघात नव्हता त्यावेळी आपलं फिटनेस चांगलं ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्याने ओळखलं. आता तो १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे.

तो किती चांगला फलंदाज आहे हे आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. पुनरागमन केल्यानंतर त्याने चांगली कामगिरी केली आहे. आता तो अधिक शांत झाला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीत काय केलं पाहिजे, याबाबत त्याला अधिक खात्री आहे, असेही रोहित शर्मा म्हणाला.

तत्पूर्वी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने अष्टपैलू कामगिरी केली. त्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला. हार्दिकने गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. तर १७ चेंडूंवर ३३ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात विजयी षटकार लगावत हार्दिकने संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर भारतीय संघासह हार्दिक पंड्याचं कौतुक तर होतच आहे, पण चाहते भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT