team india twitter
Sports

Team India News: यंदा वर्ल्डकप टीम इंडियाचाच! BCCI ने आखलाय खास प्लॅन

India Tour Of West Indies: यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धा देखील पार पडणार आहे. हा

Ankush Dhavre

India Tour Of West Indies Schedule: यावर्षी संघातील खेळाडूंचा कार्यक्रम खूप व्यस्त असणार आहे. कारण ३१ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले जाणार आहेत.

यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धा देखील पार पडणार आहे. हा व्यस्त कार्यक्रम पाहता बीसीसीआय आपल्या प्लॅनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ या मालिकेत २ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या वेळापत्रकात आता बदल केला जाणार आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, ३ टी -२० सामन्यांची मालिका वाढवून आता ५ टी -२० सामन्यांची मालिका केली जाणार आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. (Latest sports updates)

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होणार आहे. मात्र कुठल्या दिवशी कुठला सामना खेळवला जाणार याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये.

हा दौऱ्या झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आयर्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डने याबाबत माहिती दिली आहे.

भारतीय संघ जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.

हा सामना झाल्यानंतर भारतीय संघ श्रीलंका आणि अफगाणिस्थान संघासोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो. मात्र याबाबत देखील बीसीसीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT