नवी दिल्ली : सनराइजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या (umran malik) गोलंदाजीची क्रिकेटविश्वात सध्या तुफान चर्चा आहे. आयपीएलच्या इतिहासात २० व्या षटकात मेडन ओव्हर (Maiden over) फेकणाऱ्या लिस्टमध्ये उमराननं त्याचं नाव कोरलं आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाण (Irfan Pathan)आणि जयदेव उनादकटने (Jaydev unadkat) विसाव्या षटकात मेडन ओव्हर फेकण्याची जबरदस्त कामगिरी केलीय. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात उमरान मलिकच्या दमदार गोलंदाजीची जोरदार चर्चा सुरु असल्याने काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनीही ट्विट करत उमरानचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, भारतीय संघाच्या जर्सीमध्ये उमरान मलिकची आपल्याला गरज आहे. उमरानमध्ये जबरदस्त टॅलेन्ट आहे. त्याला ग्रीनटॉप टेस्ट मॅचसाठी इंग्लंडला नेण्यात यावे. त्याची मदत करा. उमरान मलिक आणि जसप्रीत बुमराह हे दोघे इंग्रजांचा बॅंड वाजवतील. अशाप्रकारे उमरानचं थरुर यांनी ट्विटरवर कौतुक केलंय.
उमरान मलिकची सर्वत्र चर्चा
४ ओव्हर, १५ डॉट बॉल, २८ धावा आणि चार विकेट्स...ही बॉलिंग फिगर आहे सनराइजर्सच्या वेगवान गोलंदाज उमरान मलिकची. सामना सुरु असताना फलंदाजांना डग आउटचा रस्ता दाखवायला भाग पाडणारा उमरान मलिक त्याच्या गोलंदाजीच्या कामगिरीमुळं चर्चेत आहे. यंदाच्या आयपीएलच्या मोसमात त्यानं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. कुणी म्हणतंय उमरान हा पुढचा शोएब अख्तर आहे. तर कुणी म्हणतंय तो डेल स्टेन आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसकीकडे खासदार शशी थरुर यांनीही त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. उमरानची लवकरात लवकर भारतीय संघात निवड करा, असं थरुर यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.
उमरानची मेडन ओव्हर आणि चार विकेट्स
रविवारी पंजाब आणि सनराइजर्स हैद्राबादमध्ये झालेल्या सामन्यात १९ व्या ओव्हरच्या शेवटापर्यंत पंजाबने ६ बाद १५१ धावा केल्या होत्या. ओडियन स्मिथ फलंदाजी करत असल्यानं पंजाब १६० धावांची मजल मारेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, उमरान मलिकने त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूत स्मिथला बाद केला. एवढच नव्हे, तर मलिकच्या ओव्हरमध्ये पंजाबला एकही धाव करता आली नाही आणि संपूर्ण टीम तंबुत परतली. मलिकच्या या ओव्हरमध्ये पंजाबने चार विकेट्स गमावल्या. ज्यामध्य एका रनआऊटचाही समावेश आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये विसावी ओव्हर मेडन फेकण्याच्या क्रमवारीत उमरान मलिकचाही समावेश झाला असून तो अशी कामगिरी करणारा चौथा खेळाडू बनला आहे. याआधी इरफान पठाण (२००८), लसिथ मलिंगा (२००९), जयदेव उनादकट (२०१७) या गोलंदाजांनी गोलंदाजीत अशी कमाल केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.