T20 World Cup, team India/BCCI Twitter saam tv
Sports

T20 World Cup: ग्रुप २ मधील चित्र स्पष्ट; सेमिफायनलमध्ये भारताचा कुणासोबत होऊ शकतो सामना?

भारताचा सेमिफायनलमध्ये कुणाशी सामना होऊ शकतो याबाबत आता उत्सुकता आहे.

Nandkumar Joshi

T20 World Cup, Team India : टीम इंडिया (Team India) ने टी २० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. टीम इंडिया ग्रुप २ मध्ये सहा गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताला अखेरचा म्हणजेच पाचवा सामना ६ नोव्हेंबरला रविवारी झिम्बाब्वेशी होणार आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध होणाऱ्या लढतीत भारताचे (Team India) पारडे जड आहे. भारताने हा सामना जिंकला तर, आठ गुण होतील. ग्रुप २ मध्ये अन्य कोणताही संघ आठ गुणांपर्यंत पोहचणार नाही. अशावेळी भारताचा सामना सेमिफायनलमध्ये ग्रुप १ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या वर्ल्डकपमध्ये भारत सुपर १२ मधून बाहेर झाला होता.

ग्रुप १ च्या बाबतीत सांगायचे झाले तर, न्यूझीलंडने ७ गुणांसह सेमिफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलियाचेही सात गुण आहेत. मात्र, त्यांचा रनरेट न्यूझीलंडपेक्षाही कमी आहे. ऑस्ट्रेलिया अजून दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांनी ग्रुप राउंडमधील सर्व पाच सामने खेळले आहेत.

इंग्लंडचे चार सामन्यांमध्ये पाच गुण आहेत. त्यांचा अंतिम सामना ५ नोव्हेंबरला श्रीलंकेसोबत होणार आहे. जर इंग्लंड हा सामना जिंकला तर, सेमिफायनलमध्ये पोहचतील. कारण त्यांचा रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे. अशात ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होईल. (Cricket News)

श्रीलंकेचा खेळ खल्लास

इंग्लंड संघाचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा खूप कमी आहे. अशात त्यांना विजय मिळाला तरी, ते दुसऱ्या स्थानीच राहतील. सेमिफायनलमध्ये त्यांचा सामना ग्रुप २ च्या टॉप संघाशी म्हणजेच भारताशी होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेचा संघ हा सामना जिंकला तर, ऑस्ट्रेलियाच्या नॉक आऊट राउंडचा मार्ग मोकळा होऊ शकतो. श्रीलंकेचा संघ सेमिफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यांचे चार सामन्यांत चार गुण आहेत. श्रीलंका सात गुणांपर्यंत पोहोचू शकत नाही.

दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड

ग्रुप २ च्या बाबतीत सांगायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ ग्रुपमध्ये चार सामन्यात पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यांचा अखेरचा सामना ६ नोव्हेंबरला नेदरलँडविरुद्ध होणार आहे. त्यामुळं त्यांची वाट खडतर दिसून येत नाही. त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांचे सात गुण होतील. ग्रुपमध्ये अन्य चार टीम सात गुणांपर्यंत पोहचू शकत नाहीत. अशात पाकिस्तानच्या आशाही संपुष्टात येतील. त्यांचे चार सामन्यांत चार गुण आहेत. भारत किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यातील एखादा संघ पराभूत झाला तर, त्यांच्या सेमिफायनलमधील आशा कायम राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर ते मुंबई विमानसेवा होणार सुरू

Maulana Controversy : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य; कार्यकर्त्यांनी मौलानाला स्टुडिओमध्ये चोपलं, VIDEO व्हायरल

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT