T20 World Cup, Ind vs Eng Semifinal 2 Saam TV
Sports

Ind Vs Eng : भारत-इंग्लंड सेमिफायनल पावसामुळं रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? काय आहे ICC चा नियम?

अॅडलेडमध्ये पावसामुळं भारत-इंग्लंड यांच्यातील सेमिफायनलचा सामना रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? काय आहे आयसीसीचा नियम

Nandkumar Joshi

T20 World Cup, Ind vs Eng Semifinal 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी २० वर्ल्डकप २०२२ मधील सेमिफायनलचा दुसरा सामना होत आहे. काही तासांतच अॅडलेडवर हा सामना खेळवला जाईल. आता प्रश्न हा आहे की येथील हवामान कसं असेल? कारण पाऊस पडला नाही तर हा सामना होऊ शकेल आणि प्रेक्षकांचंही मनोरंजन होईल. पण पाऊस पडला आणि पावसामुळं ही लढत रद्द झाली तर काय होईल? हा देखील प्रश्न आहे. जर पावसामुळं हा सामना रद्द करावा लागला तर फायनलमध्ये कोण प्रवेश करेल?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयसीसीने सेमिफायनल आणि फायनल या दोन लढतींसाठी दिवस राखून ठेवला आहे. आयसीसीच्या प्लेइंग कंडीशन्सनुसार, आज सामना सुरू झाला नाही किंवा अर्ध्यावरच खेळ थांबवला तर, तो शुक्रवारी खेळवण्यात येईल किंवा उर्वरित सामना खेळवला जाईल. (Cricket News)

पावसामुळं सामना रद्द झाल्यास काय?

आयसीसीनं राखीव दिवस ठेवला आहे, पण शुक्रवारीही पावसामुळं लढत झाली नाही तर, काय होईल हा प्रश्न आहे. त्यावर या सामन्याच्या निकालासाठी सामन्यातील किमान दहा-दहा षटके खेळणे गरजेचे आहे. जर हे शक्य झाले नाही तर, सुपर १२ मध्ये टॉपवर राहणाऱ्या संघाला फायनलमध्ये थेट प्रवेश मिळेल. म्हणजेच एकही चेंडू न खेळता भारत फायनलमध्ये पोहोचेल. (Ind vs Eng)

अॅडलेडमध्ये कसं आहे हवामान?

अॅडलेडमध्ये हा सामना होणार आहे आणि येथील हवामान कसं आहे हे जाणून घेऊयात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान हवामान उत्तम असेल. अॅडलेडमध्ये पावसाचा अंदाज असला तरी, हलक्या स्वरुपाचा असेल. पण सामना सुरू होण्याच्या आधीचा हा अंदाज आहे. त्यामुळे पावसाचा अडथळा न येता हा सामना होईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT