T20 World Cup 2022 SL vs Nam Namibia beat Sri Lanka/ ICC/Twitter  SAAM TV
क्रीडा

T20 World Cup : कमकुवत नामिबियानं बलाढ्य आशिया कप विजेत्या श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात केलं चारी मुंड्या चीत

बलाढ्य श्रीलंकेला नामिबियानं सहज पराभूत केलं. पहिल्याच सामन्यात ५५ धावांनी नमवलं

Nandkumar Joshi

T20 World Cup 2022 Namibia vs Sri Lanka : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्याची प्रचिती टी २० वर्ल्डकप २०२२ च्या पहिल्याच सामन्यात आला आहे. तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या नामिबिया संघानं पहिल्याच सामन्यात बलाढ्य आणि आशिया कप विजेत्या श्रीलंकेला पराभूत केलं आहे.

संतुलित फलंदाजी आणि खोचक गोलंदाजी या जोरावर नामिबियानं श्रीलंकेला ५५ धावांनी पराभूत केलं आहे.

टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना नामिबिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाला. नामिबियानं प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६३ धावा केल्या. हे आव्हान घेऊन नवख्या संघासमोर उतरलेल्या श्रीलंका संघाला फक्त १०८ धावाच करता आल्या. ५५ धावांनी श्रीलंका संघ पराभूत झाला. (Cricket News Update)

टी २० वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात जो विचार कुणीही केला नसेल असं घडलंय. नामिबियानं श्रीलंकेला पराभूत केलं. आशिया कप विजेत्या श्रीलंकेला पराभूत करण्याची किमया केली आहे. नामिबियानं प्रथम फलंदाजी केली. सुरुवात अडखळत झाली तरी, मधल्या फळीतील फलंदाज टिकून राहिले. २० षटकांत ७ बाद १६३ धावा केल्या. श्रीलंकेसमोर १६४ धावांचं लक्ष्य ठेवलं. (T20 World Cup)

श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात उतरले त्यावेळी सहज लक्ष्य पार करेल, असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र, सुरुवातीला बसलेल्या झटक्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी सावरली नाही. अवघ्या १०८ धावांवर डाव आटोपला. नामिबियानं ५५ धावांनी मोठा विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

SCROLL FOR NEXT