EngvsPak Saam tV
Sports

T20 World Cup: कॅप्टनशिवाय उतरलेल्या पाकिस्तानचा धुव्वा; इग्लंडकडून 4 विकेट्सने पराभव

इंग्लंडने पाकिस्तानने दिलेलं आव्हान अवघ्या 14.3 ओव्हरमध्ये गाठलं आणि एक सहज विजयाची नोंद केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T-20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानची सुरुवात पराभवाने झाली आहे. वॉर्मअप सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडने पराभूत केलं. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्याशिवाय मैदानात उतरलेल्या पाकिस्ताला 8 विकेट गमवत केवळ 160 धावांचा टप्पा गाठता आला. इंग्लंडने पाकिस्तानने दिलेलं आव्हान अवघ्या 14.3 ओव्हरमध्ये गाठलं आणि एका सहज विजयाची नोंद केली.

नसीम शाहचा शानदार फॉर्म कायम असून इंग्लंडविरुद्ध त्याने पहिल्याच षटकात पाकिस्तानला यश मिळवून दिले. फिल सॉल्ट फक्त 1 धाव काढून क्लीन बोल्ड झाला. दुखापतीतून परतलेला शाहीन आफ्रिदीला एकही विकेट घेता आली नाही. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना इंग्लंडने आपला नैसर्गिक आक्रमक खेळ दाखवला. हॅरी ब्रूकने 24 चेंडूत 45 तर सॅम कुरनने 14 चेंडूत 33 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. बेन स्टोक्सने 18 चेंडूत 36 धावा केल्या. (Cricket News)

पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद वसिम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 16 धावा देत 2.4 ओव्हरमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. नसीम आणि शादाब खानने एक-एक विकेट घेतली. शाहीन आफ्रिदीने दोन ओव्हरमध्ये केवळ सात धावा दिल्या पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.

इंग्लंडविरुद्धच्या वॉर्म अॅप सामन्यात पाकिस्तानचा संघ आपल्या कर्णधाराविना उतरला होता. तसेच विकेटकीपर मोहम्मद रिझवानला देखील आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. ओपनिंगसाठी उतरलेल्या शान मसूदने दमदार फलंदाजी करत 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. याशिवाय मोहम्मद वसीमने 26 तर इफ्तिखार अहमदने 22 धावांची खेळी केली. पावसामुळे हा सामना 19 ओव्हर्सचा खेळवला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT