ENG vs NZ: न्युझीलंड 2019 चा बदला घेणार?आज रंगणार सेमिफायनलचा थरार Twitter/@ICC
Sports

ENG vs NZ: न्युझीलंड 2019 चा बदला घेणार?आज रंगणार सेमिफायनलचा थरार

अशा स्थितीत न्यूझीलंड संघाला 2019 च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

वृत्तसंस्था

T20 विश्वचषक 2021 (T-20 World Cup 2021) आता अंतीम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. उपांत्य फेरीतील 4 संघही निश्चित झाले आहेत. या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात खेळवला जाणार आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर, दोन्ही संघ एका मोठ्या स्पर्धेच्या मोठ्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत न्यूझीलंड संघाला 2019 च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ आपला दुसरा T20 विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकत आहे.

या स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांने त्यांच्या 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. इंग्लंडचा संघ ग्रुप-1 मध्ये अव्वल होता, तर न्यूझीलंडचा संघ ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर होता. हा सामना जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीचे तिकीट निश्चित करणार आहे. या सामन्यातील विजेता संघ पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाशी सामना खेळेल.

इंग्लिश संघाचे सर्व फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. सलामीला जोस बटलर आणि जेसन रॉय संघाला चांगली सुरुवात करून देत आहेत. डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, कर्णधार ओएन मॉर्गन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मोईन अली यांनी मधल्या फळीत संघ मजबूत करण्याची जबाबदारी घेतली आहे. गेल्या सामन्यात जेसन रॉयला दुखापत झाली हा संघाला फार मोठा धक्का मानला जात होता. आता ते स्पर्धेतूनच बाहेर झाले आहेत. त्याच्या जागी जॉनी बेअरस्टो सलामीला येऊ शकतो. ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन आणि मार्क वुड यांनी वेगवान गोलंदाजीत संघाला मजबूती दिली आहे. फिरकी विभागाची धुरा आदिल रशीद आणि मोईन अलीकडे आहे. कर्णधार मॉर्गन आपल्या त्याच संघासोबत मैदानात उतरेल.

किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन आपला तोच संघ कायम ठेवणार आहे. पुन्हा एकदा मार्टिन गुप्टिल आणि डॅरिल मिशेल संघासाठी सलामीला येऊ शकतात. दोघांनीही संघाला आतापर्यंत दमदार सुरुवात करून दिली आहे. मधल्या फळीत कर्णधार विल्यमसन व्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स आणि जिमी नीशम यांनी आघाडी राखली आहे. ही संघाची ताकद आहे. कर्णधार स्वत: धावा काढण्यासाठी धडपडत आहे. मधल्या फळीत उत्तम भागीदारी आणि डाव हाताळण्याचा अभाव आहे. तथापि, फिलिप्स आणि नीशम निश्चितपणे त्यांचे काम चमकदारपणे करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT