swapnil kusale twitter
Sports

Swapnil Kusale: मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक! खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी महाराष्ट्राला पदक

Paris Olympics 2024, Swapnil Kusale: भारताचा स्टार खेळाडू स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळालं आहे. कोल्हापुरातला नेमबाज स्वप्निल कुसाळे याने नेमबाजीत कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल सात दशकानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूने पदक मिळवलं आहे. यापूर्वी खाशाबा जाधवांनी कुस्तीत कांस्यपदक मिळवलं होतं.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे. त्याला 451.4 पॉईंट्स मिळाले. अवघ्या काही पॉइंट्सने रौप्यपदकाने हुलकावणी दिली. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील आहे. खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी वैयक्तिक खेळात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा स्वप्नील कुसाळे हा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू ठरला आहे.

स्वप्नीलचा जन्म 6 ऑगस्ट 1995 रोजी कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये जन्म झाला. त्याचे वडील सुरेश शिक्षक तर आई अनिता कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत. स्वप्नीलने नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून नेमबाजीचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत पुढील सराव केला.2015 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये कनिष्ठ गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.2017 मध्ये झालेल्या 60 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये त्याने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात एकूण 3 प्रकारे शूटिंग केली जाते. उभं राहून, गुडघ्यावर बसून आणि पोटावर झोपून अशाप्रकारे शूटिंग केली जाते. यात स्वप्नीलनं कांस्यपदकाचा नेम साधला. स्वप्निलच्या विजयाचा जल्लोष पॅरिसपासून कोल्हापुरपर्यंत पाहायला मिळतोय. सोशल मीडियावरही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. कोल्हापुरात ठिकठिकाणी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. मनी, माया, मसलसाठी प्रसिद्धी असलेल्या कोल्हापुरात कुस्ती, फुटबॉलनंतर नेमबाजीतही यशस्वी खेळाडू तयार होत आहेत ही आनंदाची बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT