swapnil kusale saam tv
क्रीडा

Swapnil Kusale Exclusive: 'देशासाठी गोल्ड जिंकणं हेच टार्गेट..' स्वप्नील कुसाळेचा निर्धार

Swapnil Kusale Interview: भारताला तिसरं पदक जिंकून देणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्रात परतला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने आतापर्यंत ३ पदकं पटकावली आहेत. हे तिन्ही पदकं भारताने शूटिंगमध्ये पटकावली आहेत. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला कांस्यपदक जिंकून देत पदकांचं खातं उघडलं. त्यानंतर मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी मिळून १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात भारताला कांस्यपदक जिंकून दिलं. दरम्यान कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने २५ मीटर रायफल शूटिंग प्रकारात कांस्पदक जिंकत भारताला तिसरं पदक पटकावून दिलं. कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानान उंचावून स्वप्नीक कुसाळे महाराष्ट्रात परतला आहे.

नेमबाज स्वप्नील कुसाळे आज पुण्यात आल्यानंतर बालेवाडी स्टेडियममध्ये सत्कार करण्यात आला. पुढील स्वप्नं गोल्ड मेडल मिळवणे हेच आहे. नवीन येणाऱ्या मुलांनी जिद्द आणि चिकाटी ठेवली पाहिजे जे टारगेट डोक्यामध्ये आहे ते पूर्ण केलं पाहिजे म्हणजे यश मिळतं. सगळ्या देशांचे खेळाडू हे सारखेच आहेत. असं स्वप्नील कुसाळे म्हणाला.

पुण्यात परतल्यानंतर स्वप्नील कुसाळेने दगडू शेठ गणपती मंदिरात माथा टेकला. त्यावेळी तो म्हणाला की,'या प्रवासात जे मेडल मिळालं ते फक्त माझं नाही तर देशाचं आहे आपल्या राज्याच आहे तुमचं सगळ्यांचं आहे.सगळ्यांनी मला खूप पाठिंबा दिला खूप मदत केली. मला जो पाठिंबा भेटला त्यामुळं हे मला जिंकता आलं. मला भारी वाटत आहे की मला हा मान मिळला की मी 72 वर्षांनंतर या खेळात मेडल आणू शकलो.माझं स्वप्न इथंच संपलं नाही मला देशासाठी गोल्ड आणायचं आहे,आता मला आनंद आहे की देशासाठी पदक जिंकू शकलो पण गोल्ड मेडल जिंकायचं आहे.

'भारतात परतल्यानंतर आधी मला बाप्पाकडे जायचं होतं. हे माझं घर आहे ,मला आज आनंद वाटतोय की माझं अस स्वागत माझ्या घरात झालं. मला या खेळात वेगळेपण दिसलं,म्हणून मी हा खेळ निवडला आणि मी हळू हळू यशस्वी होत आहे.भारतीय सरकारचा खूप पाठिंबा मिळाला ,आर्थिक मदत देखील मिळली. मला परदेशात जाऊन शिकायला मिळालं यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.' असं स्वप्नील म्हणाला.

भारतात सध्या विनेश फोगाटचा मुद्दा तुफान गाजतोय. तिला १०० ग्रॅम वजन अधिक असल्यामुळे फायनलच्या सामन्याआधी अपात्र ठरवण्यात आलं आहे. याबाबत बोलताना स्वप्नीन कुसाळे म्हणाला की, ' मी खेळाडू म्हणून समजू शकतो की विनेश ला काय फील होत असेल मलाही वाईट वाटतं आहे. एक खेळाडू म्हणून मी समजू शकतो.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT