Swapnil Kusale Central Railway Pramotion Indian Express
Sports

Swapnil Kusale Pramotion: कांस्यपदक मिळताच स्वप्नील कुसाळेचं नशीब चमकलं सोन्यासारखं, भारतीय रेल्वेमध्ये झालं प्रमोशन

Swapnil Kusale Central Railway Pramotion: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिले. पदक मिळवून देताच त्याचं नशीब चमकलंय.

Bharat Jadhav

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिलं. मनू भाकर हिच्यानंतर पॅरिसमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला. दरम्यान एकाच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ३ पदक जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे. तर १९५२ नंतर महाराष्ट्राला दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक मिळालय. स्वप्नीलने महाराष्ट्राला दुसरं पदक मिळवून दिलंय.

यापूर्वी खाशाबा जाधव यांनी कुस्तीतील पहिले वैयक्तिक पदक जिंकले होतं. दरम्यान कांस्यपदक जिंकताच कुसाळे याचे नशीब चमकलंय. भारतीय रेल्वेने त्याच प्रमोशन केलं आहे. ऑलिम्पिक पदकानंतर त्याला बढती मिळाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या आधारे कुसाळे याची मुंबईतील ओएसडी, स्पोर्ट्स सेल म्हणून ( OSD, Sports Cell in Mumbai) पदोन्नती करण्यात आली आहे. याची माहिती सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलीय.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्यपदक पटकावलंय. त्याला 451.4 पॉईंट्स मिळाले. अवघ्या काही पॉइंट्सने रौप्यपदकाने त्याला हुलकावणी दिली. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील आहे. स्वप्नीलचा जन्म 6 ऑगस्ट 1995 रोजी कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये जन्म झाला. त्याचे वडील सुरेश शिक्षक तर आई अनिता कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत.

स्वप्नीलने नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून नेमबाजीचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत पुढील सराव केला.2015 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये कनिष्ठ गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती. दरम्यान आपल्या कामगिरीबद्दल कुसाळे म्हणला, आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मला शूटिंग आवडते आणि मला खूप आनंद आहे की मी इतके दिवस ते करू शकलो. मनू भाकर यांना पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. ती जिंकू शकली तर आपणही जिंकू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT