viral video instagram
Sports

Suryakumar Yadav: मिस्टर ३६० ला बॉलिंग करताना पाहिलंय का? कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडू टाकत घेतला भन्नाट कॅच; VIDEO पाहायलाच हवा

Suryakumar Yadav Bowling Video: तुम्ही सुर्यकुमार यादवला कधी गोलंदाजी करताना पाहिलं आहे का?

Ankush Dhavre

Cricket Viral Video: भारतीय संघातील फलंदाज सुर्यकुमार यादव हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने फलंदाजी करत असताना अनेक दिग्गच गोलंदाजांची धुलाई केली आहे.

मात्र तुम्ही सुर्यकुमार यादवला कधी गोलंदाजी करताना पाहिलं आहे का? क्वचितच पाहिलं असेल. दरम्यान नुकताच सुर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो गोलंदाजी करताना दिसतोय.

सुर्यकुमार यादवने मिळवली विकेट..

मैदानाच्या चारही बाजुंना शॉट खेळून धावांचा पाऊस पाडणारा सुर्यकुमार यादव हा उत्तम गोलंदाज देखील आहे. नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसुन येत आहे.

आपल्याच गोलंदाजीवर घेतला कॅच...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिलीप ट्रॉफी २०१७ स्पर्धेतील आहे. या स्पर्धेत सुर्यकुमार यादव हा इंडिया रेड संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या संघाकडून खेळताना त्याने इंडिया ब्लु संघातील फलंदाज भार्गव भट्ट्चा झेल टिपला होता. तर झाले असे की, इंडिया रेड संघाचे प्रतिनिधित्व करताना दुसऱ्या डावात ४५ वे षटक टाकण्यासाठी सुर्यकुमार यादव गोलंदाजीला आला होता.

या षटकातील दुसराच चेंडू त्याने शॉर्ट टाकला ज्यावर फलंदाजी करत असलेल्या भार्गव भट्टने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला कारण, चेंडू क्षेत्ररक्षकाला लागुन गोलंदाजी करत असलेल्या सुर्यकुमार यादवच्या हातात गेला. त्याने कुठलीही चुक न करता डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. (Latest sports updates)

सूर्यकुमार यादवची कामगिरी..

सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमधील नंबर १ चा फलंदाज आहे. त्याच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ४८ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४६.५ च्या सरासरीने १६७५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT