suryakumar yadav twitter
Sports

IPL 2025 : सूर्यकुमार यादव दुसऱ्या संघाकडून खेळणार? मुंबई इंडियन्सने भूमिका केली स्पष्ट

Mumbai Indians On Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स सोडून जाणार असल्याची चर्चा सुरु असताना मुंबई इंडियन्सने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेची चर्चा रंगायला सुरु झाली आहे. या स्पर्धेसाठी येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची डिमांड वाढल्याचं दिसून येत आहे.

सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा हे मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. रोहित मेगा ऑक्शनमध्ये येणार असल्याचं म्हटलं जातंय. तर सूर्यकुमार यादवला कोलकाता नाईट रायडर्स संघाने थेट कॅप्टन्सीची ऑफर दिली असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याला नवी ओळख मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून अशी चर्चा सुरु आहे की, सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स सोडून कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. मात्र या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे.

लाईव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स सोडून कुठेही जाणार नाहीये. लोकं लक्ष वेधून घेण्यासाठी अफवा पसरवत आहेत. मात्र सूर्यकुमार यादव कुठेही जाणार नाहीये.

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख फलंदाज आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ त्याला सोडण्याची रिस्क घेणार नाही. मुंबई इंडियन्स त्याला रिटेन करु शकते. सूर्यकुमार कुमारचा रेकॉर्ड पाहिला,तर त्याने आयपीएल स्पर्धेतील १५० सामन्यांमध्ये ३५९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं आणि २४ अर्धशतक झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT