Suryakumar yadav cryptic instagram story ahead of ipl 2024 know the reason  twitter
क्रीडा

Suryakumar Yadav Heartbreak Story: सूर्यकुमार यादवचा पुन्हा एकदा हार्टब्रेक! नेमकं कारण काय? जाणून घ्या

Suryakumar Yadav Instagram Story: या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हार्टब्रेकचा इमोजी शेअर केला आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Instagram Story:

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर मुंबईचा पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरातविरुद्ध होणार आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हार्टब्रेकचा इमोजी शेअर केला आहे.

नेमकं कारण काय?

सूर्यकुमार यादवने इंस्टाग्राम स्टोरी अपलोड करताच, नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. या स्टोरीवरुन नेटकऱ्यांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे. काहींनी तर थेट हार्दिक पंड्यावर निशाणा साधला आहे.

आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे. या हंगामासाठी झालेल्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात ट्रेड केलं. त्याला संघात घेण्यासाठी मुंबईने १५ कोटी रुपये मोजले. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली. (Cricket news in marathi)

दुखापतीमुळे होऊ शकतो बाहेर..

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. या मालिकेदरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाली असून तो फिट होतोय. मात्र अजूनही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. माध्यमातील वृत्तानुसार तो सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. दरम्यान हेच कारण असावं आणि त्यामुळेच त्याने ही स्टोरी शेअर केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT