Suryakumar yadav
Suryakumar yadav Twitter
क्रीडा | IPL

Suryakumar Yadav: टी - ट्वेंटीत धो धो बरसला, मात्र वनडेत 'सूर्या' मावळला..

Ankush Dhavre

Ind vs Aus 3rd ODI: नुकताच भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

मात्र पुढील २ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावली आहे.

या मालिकेतील तीनही सामन्यात सूर्यकुमार यादवला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र तो या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

सूर्यकुमार यादव हा टी -२० क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तुफान फटकेबाजी आणि मैदानाच्या चारही बाजूंना शॉट खेळण्याचं कौशल्य असल्यामुळे त्याने खूप कमी वेळात नाव कमावलं. (Latest sports updates)

मात्र त्याला वनडेत आपल्या फलंदाजीची जादू दाखवता आली नाहीये.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत त्याला ऑस्ट्रेलिया संघाविरूध्द झालेल्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली होती. मात्र तीनही सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.

यासह तो वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सलग ३ वेळा शून्यावर बाद होणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये तो पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला.

तसेच त्याच्या टी -२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ४८ टी -२० सामन्यांमध्ये १६७५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.

त्याची ही निराशाजनक कामगिरी पाहता चाहते संजू सॅमसन किंवा दीपक हुड्डाला संघात संधी देण्याची मागणी करू लागले आहेत. कारण श्रेयस अय्यर केव्हा परतणार याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

SCROLL FOR NEXT