प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या दहाव्या हंगामात बेंगळुरू बुल्सने ३ वेळेस दमदार कामगिरी करत वेळा जेतेपद पटकावणाऱ्या पटना पायरेटसवर ३४-३३ असा थरारक विजय मिळवला. बेंगळुरू बुल्सकडून डिफेंडर सुरजीत सिंग(८ गुण) याने तर, पटना पायरेटसकडून कर्णधार नीरज कुमारने(५ गुण) दमदार खेळ केला.
एनएससीआय स्टेडियममध्ये पार पडलेल्या या लढतीत बेंगळुरू बुल्सला सुरुवातीला भरतची उणीव भासली. दोन्हीही संघांनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला व तिसऱ्या मिनिटाला ३-३ अशी बरोबरी होती. मात्र, १४ व्या मिनिटाला पटनाने जोरदार खेळ करत बेंगळुरू बुल्सवर पहिला लोन चढवला व सामन्यात १६-८ अशी आघाडी मिळवली.
पहिल्या हाल्फमध्ये पटना संघ मजबूत स्थितीत होता. १७ व्या मिनिटाला बेंगळुरूच्या विकास कंडोलाला डू ऑर डायमध्ये बाद केले व आपली आघाडी २०-१२ अशी आणखी मजबूत केली. पूर्वार्धात ही आघाडी कायम होती. (Kabaddi News In Marathi)
मध्यंतराला बेंगळूरु संघाने सुशील आणि रक्षित यांना संधी दिली. मात्र त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. सामन्यातील २७ व्या मिनिटाला विकास कंडोलाची पकड नीरजने पकड करून पटना संघाची आघाडी १० गुणांच्या फरकाने २४-१४ अशी वाढवली. बेंगळूरुकडून सचिन नरवालने सुरेख खेळ करून संघाला गुण मिळवून दिले. तर, सुरजीतच्या हाय ५ गुणामुळे ही आघाडी आणखी कमी झाली.पण पटनाकडून सचिनने सुपर रेड करताना संघाला 3गुण मिळवून दिले.
पिछाडीवर असलेल्या बेंगळूरु बुल्स च्या सुरजीत आणि रान सिंग यांनी सुपर टॅकल करून संघाचे आव्हान कायम राखले. सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना बेंगळूरु बुल्स ३३-२५ असा आठ गुणांच्या फरकाने पिछाडीवर होता. बेंगळूरु संघाच्या सुशीलने महत्वपूर्ण दोन गुण मिळवले. यावेळी पटना संघाचा एकच गडी मैदानात होता.
सूरजीतने संदीप कुमार ला सुपर टॅकलकरून पटना संघावर मोक्याच्या क्षणी लोन चढविला व संघाला एक गुणाने आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत बेंगळूरु बुल्स संघाने पटना पायरेटसवर विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.