Suresh Raina Saam TV
Sports

सुरेश रैना IPL मधील नवीन भूमिकेसाठी सज्ज, म्हणाला ' मी आनंदी आणि उत्सुक'

मंगळवारी २२ मार्चला स्टार स्पोर्ट्सने यंदाच्या हंगामातील समालोचकांची नावं जाहीर केली आहे.

वृत्तसंस्था

MR.IPL म्हणून आपला नाव लौकीक मिळवणारा सुरेश रैना यंदाच्या हंगामात अनसोल्ड राहिला. हा वैयक्तीक त्याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांनी खूप मोठी धक्का होता. २००८ पासून चेन्नईच्या संघात खेळणाऱ्या रैनाने (Suresh Raina) आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले. एमएस धोनीचा तो सर्वात लाडका खेळाडू होता. आता रैनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रैना यंदाच्या हंगामात (IPL 2022) समालोचकाच्या (commentary box) भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे खेळाडू म्हणून जरी रैना अनसोल्ड ठरला असला तरी ही बाजी मात्र जिंकली आहे.

मंगळवारी २२ मार्चला स्टार स्पोर्ट्सने यंदाच्या हंगामातील समालोचकांची नावं जाहीर केली आहे. आणि त्यापैकी एक नाव हे सुरेश रैनाचे आहे. रैना आपल्या आकाश चोप्रा, इरफान पठाण, आणि रवी शास्त्री यांच्यासोबत हिंदीमध्ये समालोचन करताना दिसणार आहे. यावरती रैना पहिल्यांदाच आपल्या भावना सर्वांसमोर मांडल्या आहेत. मी खूप खूप आनंदी आहे, ही नवी भूमिकेसाठी मी खूप उत्सूक आहे असे रैना स्टार स्पोर्ट्सने आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला.

''लिलावात मिळालेल्या किंमतीमुळे तरुण मुलांवर प्रचंड दबाव''

दरम्यान, रैनाने खेळाडूंवरती ज्यावेळी किंमतीचे टॅग लावले जातात तेव्हा ते खेळाडू कोणत्या दबावातून जातात, याचा थेट परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो असे रैना म्हणाला. “लिलावात मिळालेल्या किंमतीमुळे तरुण मुलांवर प्रचंड दबाव आहे. फ्रँचायझी, कर्णधार यांच्याकडून नेहमीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. एखाद्या खेळाडूच्या खेळावर किंमतीच्या टॅगचा किती मोठा परिणाम होतो हे आपण अनेकदा पाहिले आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामात कोणत्या खेळाडूंवरती लक्ष असेल असे विचारले असता रैना म्हणाला इशान किशन, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, मोईन अली आणि ऋषभ पंत.

२०२१ च्या आयपीएल हंगामात रैनाला काही खास कामगिरी करता आली नाही. रैनाने २०२१ च्या हंगामात केवळ १६० धावा केल्या . मात्र, तो संघाचा कणा आणि कर्णधाराचा मोठा आधार होता. त्याने अनेकदा संघाचा कर्णधार आणि एमएस धोनीसोबत असलेल्या बाँडबद्दल सांगितले आहे. याच कारणांमुळे त्याला प्रेमाने ‘चिन्ना थाला’ म्हटले जाते. त्याला धोनीचा उजवा हात म्हणून देखील ओळखले जात होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dosa Recipe : मुलं दुधी भोपळा खात नाहीत? मग 'असा' बनवा कुरकुरीत डोसा, एकदा चव चाखताच पुन्हा पुन्हा मागतील

Maharashtra News Live Update: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांची अखेर बदली

मोठी बातमी! विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली, अविनाश रणखांब यांच्याकडे नवीन जबाबदारी

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, २ ते ३ वाहनं एकमेकांवर धडकली

Property Registration : मोठी बातमी! आता जमिनीच्या व्यवहारासाठीही आधारकार्ड बंधनकारक, सरकारकडे प्रस्ताव

SCROLL FOR NEXT