suresh rain cousin brother lost their lives in road accident amd2000 yandex
Sports

Suresh Raina: सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तींचे अपघातात निधन

Suresh Raina Cousin Brother Death: भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रस्ते अपघातात त्याच्या मामाच्या मुलासह २ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात घडली असल्याचं म्हटलं जात आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपीने पळ काढला, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली आहे. (Suresh Raina)

घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी म्हटले की, ही घटना बुधवारी रात्री ११:३० च्या दरम्यान घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीला धडक दिल्याने हा अपघात झाला. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून, त्याच्यावर कारवाई देखील केली आहे. या आरोपीचं नाव शेर सिंग असल्याचं म्हटलं जात आहे. या धक्कादायक दुर्घटनेत स्कुटी चालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत पावलेल्यांची नावं सौरव कुमार आणि शुभम असल्याचं म्हटलं जात आहे.

कांगडा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी शालिनी अग्निहोत्री यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना म्हटले की, 'गग्गल पोलिस स्टेशनच्या हद्दीत हिट अँड रनचं प्रकरण समोर असल्याचं म्हटलं जात आहे. स्कुटीवर जात असलेल्या तरुणांना धडक दिल्यानंतर कार चालकाने तिथून पळ काढला. फरार आरोपीचा पाठलाग केल्यानंतर अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीएमपीच्या बस डेपोत सुधारणा करा, पुण्याच्या आयुक्तांचे आदेश

Morning Heel Pain: सकाळी झोपेतून उठताच पायाचे तळवे दुखतायत? ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण; डॉक्टरांनी सांगितली कारणं

Wai Fort : कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् भव्य डोंगररांग; वाईजवळ लपलाय खतरनाक किल्ला, चढाई पाहूनच उडेल धडकी

ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; सामाजिक क्षेत्रात खळबळ

Marathi Actor : मराठमोळा अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनी झाला बाबा, PHOTO शेअर करत दाखवली मुलांची झलक

SCROLL FOR NEXT