संघात स्थान पाहिजे 'संतुष्ट' करावं लागेल; श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा गंभीर आरोप Saam TV
Sports

संघात स्थान पाहिजे 'संतुष्ट' करावं लागेल; श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा गंभीर आरोप

2014 मध्ये, श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने निवडकर्त्यांवर आरोप केला होता की महिलांना सांगण्यात आले होते....

वृत्तसंस्था

क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्याचे चाहते जगभरात आहेत. प्रत्येकाला आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय संघासाठी खेळायचे असते. श्रीलंकेतही क्रिकेट खूप प्रसिद्ध आहे. 2014 मध्ये श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने निवड समितीवर असे आरोप केले होते, त्यामुळे क्रिकेट विश्वात भूकंप आला होता.

महिला संघाचा गंभीर आरोप

2014 मध्ये, श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने निवडकर्त्यांवर आरोप केला होता की महिलांना सांगण्यात आले होते की संघात स्थान निश्चित करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील. त्या पुढे म्हणाल्या की, जी महिला हे करेल त्यांनाच राष्ट्रीय संघात स्थान मिळेल. महिला क्रिकेटपटूंनी काही निवडकर्त्यांच्या या मागणीबद्दल तक्रार केली. संघात स्थान हवे असेल तर आम्हाला संतुष्ट करावे लागेल अशी मागणी निवडकर्ते करत. या प्रसंगाने श्रीलंकेचे क्रिकेट हादरले. यानंतर श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने (Shri Lanka Cricket Board) चौकशीचे आदेश दिले.

बोर्डाने दिले चौकशीचे आदेश

श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाच्या या आरोपानंतर क्रिकेट जगतात भूकंप आला होता. ही बातमी जगभर आगीसारखी पसरली आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने तातडीने कारवाई करत चौकशीचे आदेश दिले. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाचा तपास तत्कालीन मुख्य निवडकर्ता सनथ जयसूर्या यांच्यासह तीन अधिकाऱ्यांकडे सोपवला होता.

अशा प्रकारे न्याय मिळाला

श्रीलंकेला 1996 मध्ये विश्वचषक जिंकून देणाऱ्या सनथ जयसूर्याने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला आणि बरोबर 7 महिन्यांनंतर तो निष्कर्षापर्यंत पोहोचला. जयसूर्याने तपासाची चक्र वेगात फिरवली आणि यात तीन अधिकारी दोषी आढळले. ७ महिने चाललेल्या या तपासात दोन अधिकारी थेट लैंगिक संबंध तर एक अधिकारी अयोग्य वर्तन करत असल्याचे उघड झाले. मात्र, जयसूर्या यांच्या समितीला असे आढळून आले की, कोणत्याही व्यक्तीसोबत शारीरिक संबंध झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. जयसूर्याच्या या अहवालानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दोषी आढळलेल्या तिन्ही निवडकर्त्यांची तात्काळ हकालपट्टी केली. अशा प्रकारे श्रीलंकेच्या महिला खेळाडूंना न्याय मिळाला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT