SRH Qualify For Playoffs: Network
क्रीडा

SRH Qualify For Playoffs: हैदराबादची झाली 'चांदी'; एकही चेंडू न खेळता मिळालं प्लेऑफचं तिकीट

Bharat Jadhav

प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या हैदराबाद संघाची आजड चांदी झाली. एकही चेंडू न खेळता पॅट कमिन्सच्या संघाने प्लेऑफचे तिकीट मिळलंय. हे तिकीट मिळवण्यासाठी चक्क वरुणराजाने मदत केलीय. आज हैदराबादचा सामना गुजरातच्या संघाशी होणार होता. परंतु सामना सुरू होण्याआधीच वरुणराजाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादचा सामना रद्द झाला. यामुळे हैदराबाद प्लेऑफसाठी पात्र ठरलाय. प्लेऑफसाठी पात्र ठरणारा हैदराबाद तिसरा संघ ठरलाय. सामना रद्द झाल्यानंतर हैदराबादचे १३ सामन्यांत १५ गुण झाले आहेत. यामुळे दोन संघांना बाहेरचा रास्ता दाखवण्यात आलाय.

दिल्ली आणि लखनऊ गेले बाहेर

दिल्ली आणि लखनऊचे संघ सतत प्लेऑफच्या शर्यतीत होते. मात्र पावसामुळे हैदराबादला एक गुण मिळाला आणि दिल्ली आणि लखनऊच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेलं. पर्यायी या दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. हैदराबादचा अजून एक सामना बाकी आहे. हैदराबादचा साखळी फेरीचा शेवटचा सामना १९ मे रोजी प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या पंजाबविरुद्ध होणार आहे.

दरम्यान मुसळधार पावसाने हैदराबादची चांदी केली असताना चेन्नई आणि आरसीबीच्या संघाची धकधक वाढवलीय. या दोन्ही संघाच्या सामन्यावर पावसाचा मोठा परिणाम झालाय. प्लेऑफसाठी दोन संघांची नावे आधीच जाहीर झाली आहेत. ज्यात टेबल टॉपर कोलकाता आणि दुसरा संघ राजस्थान आहे. आता हैदराबाद तिसऱ्या स्थानासाठी पात्र ठरलाय. आरसीबी आणि चेन्नई यांचा सामना झाल्यानंतर चौथा संघ कोणता असेल हे निश्चित होईल. दोन्ही संघाचा सामना चिनास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान १८ मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यानंतर प्लेऑफच्या फेरीत चौथा संघ कोणता असेल हे कळेल. पहिला क्वालिफायर सामना २१ मे रोजी खेळवला जाईल, त्यानंतर २२ मे रोजी एलिमिनेटर सामना होईल. क्वालिफायर-२ चा सामना २४ मे रोजी होणार आहे तर आयपीएलचा २०२४ चा अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT