Rishabh Pant
Rishabh Pant  Saam TV
क्रीडा | IPL

Rishabh Pant Video: रिषभ पंत टीम इंडियात येतोय? VIDEO पाहून नक्कीच म्हणाल घासून नाही तर ठासून येणार

साम टिव्ही ब्युरो

Rishabh Pant Latest Video: टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत संघात कमबॅकसाठी खूप मेहनत घेत आहे. ऋषभ पंतचा काही महिन्यांपूर्वी भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात तो थोडक्यात बचावला होता. त्यानंतर अनेक दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आता तो हळूहळू रिकव्हर होत आहे. मात्र पुन्हा मैदानात परतण्यासाठी त्याला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे.

बीसीसीआयची मेडिकल टीम ऋषभला लवकरात लवकर बरे करण्याचे प्रयत्न करत आहे. नुकतीच त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत स्विमिंग पूलमध्ये काठीच्या साहाय्याने फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, छोट्या, मोठ्या आणि मधल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे. (Sports News)

व्हिडिओमध्ये ऋषभ पंतला पाहून त्याचे चाहते खूप खूश आहेत. आता पंत लवकरच मैदानात परतेल अशी आशा चाहत्यांना आहे. पंतचा अपघात इतका धोकादायक होता की संपूर्ण भारतभरातून त्याच्यासाठी प्रार्थना सुरु होत्या. मात्र पंतचा लेटेस्ट व्हिडीओ पाहून त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी असल्याचं दिसतं आहे.

पंतचा हा व्हिडिओ टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही लाईक केला आहे. रवी शास्त्री यांनी कमेंटमध्ये लिहिले की, कीप इट अप पंत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन पंतच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने खूप खूश आहे. त्याने कमेंटमध्ये 'क्लॅप' इमोजी शेअर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

1000 Cr. Earn Indian Films : १००० कोटी कमावलेले हिंदी चित्रपट तुम्ही पाहिले का ?, पाहा यादी

OBC Bahujan Party: सुप्रिया सुळे,विशाल पाटील वंचित कसे? 'वंचित'च्या पाठिंब्यावर ओबीसी बहुजन पार्टी प्रकाश आंबेडकरांवर नाराज

Suresh Raina: सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तींचे अपघातात निधन

Today's Marathi News Live : कराडमध्ये केमिकल गॅसच्या टँकरला गळती

SCROLL FOR NEXT