IPL 2023, BCCI / Social Media
IPL 2023, BCCI / Social Media saam tv
क्रीडा | IPL

IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाहीत काही स्टार खेळाडू; कारणंही आली समोर

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा नवीन सीजन लवकरच सुरु होणार आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ३१ मार्च रोजी होणार आहे. मात्र काही स्टार खेळाडू या आयपीएलच्या सीजनमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या फॅन्सची निराशा होऊ शकते.  ऋषभ पंतपासून जसप्रीत बुमराह सारखे काही खेळाडूंचा यात समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे बर्‍याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळे तोही या सीजनमध्ये दिसणार नाही. ऋषभच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करणार आहे. (Sports News)

मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची आयपीएलच्या या हंगामात दिसणार नाही. बुमराह मागील वर्षभरापासून पाठीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. आता तो शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला गेला आहे, त्यानंतर बुमराह मैदानात कधी दिसेल याबाबत कोणतीही माहिती अद्याप तरी उपलब्ध नाही.

यंदाच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज काईल जेम्सन देखील स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या समोर आल्यानंतर या हंगामात खेळताना दिसणार नाही. याशिवाय मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्ड्सला हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे शस्त्रक्रिया करावी लागली आणि यामुळे तो या आयपीएल हंगामात खेळताना दिसणार नाही.

गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजीने चमकदार कामगिरी करणारा प्रसिद्ध कृष्णाही पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे या मोसमात खेळताना दिसणार नाही. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या समस्येमुळे यंदाच्या सीजनमध्ये फर्स्ट हाफमधून बाहेर जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT