वर्ल्डकप फायनल होऊन एक महिना उलटला आहे. तरीही फायनल गमावल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. या पराभवाला मागे सारत भारतीय संघ पुढे निघण्याच्या प्रयत्नात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका बरोबरीत सुटल्यानंतर भारती संघाने वनडे मालिकेवर २-१ ने कब्जा केला. (India vs South Africa 1st test)
आता भारतीय संघ कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. गेल्या ३१ वर्षांत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळे यावेळी भारतीय खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो.
भारतीय संघाचा मास्टरप्लान..
विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्ल्डकप फायनलनंतर पहिल्यांदाच खेळताना दिसून येणार आहे. विराट कोहली गेले काही दिवस लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आंनद घेत होता. तर रोहितनेही स्वत:ला माध्यमांपासून दूर ठेवलं आहे.
दोघेही आगामी कसोटी सामन्यापूर्वी नेट्समध्ये कसून सराव करताना दिसून आले. मात्र यावेळी दोघांनीही एकमेकांसोबत कुठलाही संवाद साधला नाही. वर्ल्डकप सुरु असताना खेळाडू एकमेकांसोबत मजा मस्ती करताना दिसून येत होते. मात्र यावेळी खेळाडूंनी मजाक मस्ती न करता संपूर्ण लक्ष आपलं सराव करण्यावर केंद्रित केलं.
राहुल द्रविडचं बारीक लक्ष..
मुख्य प्रशिक्षक केएल राहुल यांचं फलंदाजीचा सराव करत असलेल्या फलंदाजावर बारीक लक्ष होतं. केएल राहुल यावेळी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून आला. तर ईशान किशनची रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेला केएस भरत यावेळी विकेटकिपिंग करताना दिसून आला नाही. यावरुन हे स्पष्ट आहे की, केएल राहुल या सामन्यात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसूने येईल. (Latest sports updates)
रोहित-जयस्वालची जोरदार तयारी..
फलंदाजीचा सराव सुरु असताना विराट कोहली राहुल द्रविडसोबत चर्चा करताना दिसून आला. त्यानंतर विराट थ्रो डाऊनवर फलंदाजी करताना दिसून आला. या सामन्यात रोहित आणि जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. ही जोडी देखील नेट्समध्ये घाम गाळताना दिसून आली. तर शुभमन गिल नेट्समध्ये पुल शॉट्सचा सराव करताना दिसून आला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.