Aiden Markram saam tv
Sports

IND VS SA : भारताला 279 धावांचं टार्गेट, आफ्रिकेच्या हेंड्रीक्स-मार्करमची अर्धशतकी खेळी

आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज रिझा हेंड्रीक्सने आणि एडन मार्करमने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली.

नरेश शेंडे

रांची : ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरला टी-20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तत्पूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सूरू आहे. आज भारतासाठी आफ्रिका विरुद्ध निर्णायक सामना होत आहे. हा दुसरा एकदिवसीय सामना रांची येथे होत असून आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फंलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मैदानात उतरलेले सलामीवीर फलंदाज क्विंटन डीकॉक आणि जानेमन मलालने निराशाजनक कामगिरी करून तंबूत परतले. परंतु, आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज रिझा हेंड्रीक्सने आणि एडन मार्करमने जबरदस्त अर्धशतकी खेळी करत आफ्रिकेला धावांचा सूर गवसून दिला. दरम्यान, आफ्रिकेने 50 षटकात 278 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 279 धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. ( (India vs South Africa second one day match update)

दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर फंलंदाज क्विंटन डीकॉक आणि जानेमन मलानने निराशाजनक कामगिरी केली. आफ्रिकेसाठी पॉवर प्लेमध्ये त्यांना धावांचा पाऊस पाडता आला नाही. कारण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) अवघ्या 5 धावांवर असताना डीकॉकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर दबावात खेळत असलेल्या मलानलाही चमकदार कामगिरी करता आली नाही. शाहबाज अहमदने मलानला 25 धावांवर असताना पायचित केले.

परंतु, आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज रिझा हेंड्रीक्सने (Reeza Hendricks) धावसंख्येचा वेग वाढवला. अतिशय सावधपणे फलंदाजी करत रिझाने 76 चेंडूत 74 धावा केल्या. या इनिंगमध्ये रिझाने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला. मात्र, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रिझा झेलबाद झाल्याने आफ्रिकेला पुन्हा एकदा धक्का बसला.

त्यानंतर हेनरिक क्लासेनने आफ्रिकेची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही 30 धावाच करता आल्याने आफ्रिकेच्या धावफलकाला पुन्हा ब्रेक लागला. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर क्लासेन झेलबाद झाला. पण एडन मार्क्ररमने (Aiden Markram) अप्रतिम फलंदाजी करत 89 चेंडूत 79 धावा केल्या. या पारीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. तसेच डेव्हिड मिलरने 34 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी साकारत आफ्रिकेच्या धावांचा आलेख चढता ठेवला. भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने 10 षटकात 38 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

Sharad Pawar: महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य पुन्हा उभे करावे लागेल- शरद पवार|VIDEO

Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

Investment Tips: फक्त १००० रूपयांची गुंतवणूक करा अन् लखपती व्हा, कसं ते जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT