south africa cricket team  saam tv
क्रीडा

ICC ODI Rankings: वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! मालिका गमावताच मिळाली वाईट बातमी

Ankush Dhavre

ICC ODI Rankings:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १२२ धावांनी विजय मिळवला आहे. यासह या मालिकेवर ३-२ ने नाव कोरलं आहे.

शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ३१५ धावांचा डोंगर उभारला होता. या डावात एडेन मार्करमने ९३ धावांची तुफानी खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९३ धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अवघ्या ३४ धावांवर जोश ईंग्लिस आणि डेव्हिड वॉर्नरची जोडी माघारी परतली. त्यानंतर मिचेल मार्श आणि मार्नस लाबुशेन यांच्यात ९० धावांची भागीदारी झाली.

मार्शने या डावात ७१ तर लाबुशेनने ४४ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना मार्को यान्सेनने ३९ धावा खर्च करत ५ गडी बाद केले.

दक्षिण आफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर..

या डावात दक्षिण आफ्रिकेकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. एडेन मार्करमने ८७ चेंडूंचा सामना करत ९३ तर डेव्हिड वॉर्नरने ६३ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून १०९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवणाऱ्या मार्को यान्सेनने २३ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ४७ धावांची खेळी केली. तर एंडिले फेलुकवायोने ३९ धावांचे योगदान दिले. या मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी घसरला आहे. (Latest sports updates)

भारत -ऑस्ट्रेलियात रंगणार मालिका..

दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

तर मालिकेतील दुसरा सामना २४ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तसेच मालिकेतील शेवटचा सामना २७ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT