Palash Muchhal saam tv
Sports

स्मृतीने अखेर लग्नावर मौन सोडलं, मोठा निर्णय घेतला; पलाशचीही त्याच वेळी पोस्ट.. वाचा कोण काय म्हणाले

Smriti Mandhana palash muchhal wedding cansel : भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी त्यांचे लग्न रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर दोघांनीही पोस्ट करून अफवांना पूर्णविराम दिला असून प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती केली आहे.

Namdeo Kumbhar

Smriti Mandhana palash muchhal Marriage Called Off : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर रद्द झाले आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीमध्ये २३ नोव्हेंबर रोजी दोघांचे थाटामाटात लग्न पार पडणार होते. लग्नाआधीचे सर्व विधी, साखरपुड्यासह संगीत या गोष्टी झाल्या. पण अचानक लग्न पुढे ढकलल्याची बातमी धडकली अन् देशभरात चर्चा सुरू झाल्या. आता स्मृती मानधना आणि पलाश यांनी लग्न रद्द झाल्याचे सांगितलेय. दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली. कोण काय म्हणाले...

स्मृती मानधनाने आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले?

गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल अफवा आणि तर्कवितर्क सुरू आहेत. मला आता याविषयी बोलणं गरजेचं वाटतंय. मी खूप खासगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि तसंच राहू इच्छा आहे. लग्न रद्द झाल्याचेही स्पष्ट करायचे आहे. मी हा विषय इथेच संपवू इच्छिते. तुम्हीही तसेच करावे, अशी माझी विनंती आहे. दोन्ही कुटुंबांच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी नम्र विनंती आहे. आम्हाला पुढे जाण्यासाठी स्पेस द्यावा. प्रत्येकाच्या आय़ुष्यत काहीतरी ध्येय असतेच. देशासाठी खेळत राहणे अन् चषकावर नाव कोरणं हेच माझं ध्येय आहे. मी शक्य तितक्या काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन अशी आशा आहे. माझे संपूर्ण लक्ष नेहमी तिकडेच राहील. तुमच्या सगळ्या साथीचे आणि प्रेमाचे मनापासून आभार. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. धन्यवाद!

Smriti Mandhana palash muchhal Marriage Called Off

पलाश आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला?-

मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि त्या नात्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी सर्वात पवित्र असलेल्या गोष्टीबद्दल बिनबुडाच्या अफवांवर लोक इतक्या सहज प्रतिक्रिया देताना पाहणं खूप कठीण गेलं आहे. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड टप्पा आहे, याचा मी शांततेत शालीनतेने याचा सामना करेन.

palash muchhal Marriage Called Off

अफवांचा कसलाही पुरावा नसतो आणि ज्यांचे स्रोत कधीच समोर येत नाहीत, अशा बिनबुडाच्या गॉसिपवरून एखाद्यावर टीका करण्यापूर्वी आपण विचार करावा. आपली शब्द इतरांना जखम देऊ शकतात. त्याच्या वेदना आपल्याला कधीच पूर्णपणे समजणार नाहीत. जेव्हा आपण अशा क्षुल्लक गोष्टींवर वेळ घालवतो, तेव्हा जगात कितीतरी लोक अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या संकटांतून जात आहेत. खोटी आणि मानहानीकारक माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे. या कठीण काळात प्रेमाने आणि साथीने माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT