महिला हॉकी संघाच्या कामगिरीवर शाहरुख खान खुश! खऱ्या कबीर खानला म्हणाला... Saam Tv
Sports

महिला हॉकी संघाच्या कामगिरीवर शाहरुख खान खुश! खऱ्या कबीर खानला म्हणाला...

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजयानंतर शाहरुखने सोमवारी ट्विटरवर भारतीय महिला हॉकी प्रशिक्षक स्जोर्ड मरिजने यांचे अभिनंदन केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान Shah Rukh Khan त्याच्या नवीन ट्विटमुळे चर्चेत असतो. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध Australia ऐतिहासिक विजयानंतर शाहरुखने सोमवारी ट्विटरवर भारतीय महिला हॉकी प्रशिक्षक स्जोर्ड मरिजने Sjoerd Marijne यांचे अभिनंदन केले. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो 2020 च्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठली.

गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या शानदार ड्रॅगफ्लिकने सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला आघाडी मिळवून दिली. सात पेनल्टी कॉर्नर मिळवूनही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची टीम ऑस्ट्रेलिया या सामन्यात गोल करू शकली नाही आणि सामना 1-0 ने गमावला. सामन्यानंतर तिच्या टीमसोबत सेलिब्रेट करणाऱ्या स्जोर्ड मरिजने ट्विटरवर एक छायाचित्र पोस्ट केले ज्यामध्ये संपूर्ण टीम बसमध्ये विजयाचा आनंद घेताना दिसत आहे.

शाहरुख खानने सोने आणण्याची केली विनंती;
केली 2007 च्या ब्लॉकबस्टर हिट 'चक दे ​​इंडिया'मध्ये महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक कबीर खान यांची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानने मरिज ला कोट्यवधी भारतीय चाहत्यांसाठी सुवर्णपदक जिंकण्याची विनंती केली आहे. अभिनेता शाहरुख खानने महिला हॉकी संघाला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहे. शाहरुखने सोर्ड मारजेनची ट्वीट रिट्वीट करत लिहिले, हा.. हा... येताना फक्त आपल्या बिलियन कुटुंबियांसाठी गोल्ड पदक घेऊन या... या वर्षी देखील धनोत्रयोदशी 2 नोव्हेंबरला आहे.. From - एक्स कोच कबिर सिंग


प्रशिक्षकने, अभिनेता शाहरुखच्या ट्विटला उत्तम प्रतिसाद दिला. मरीजने लिहिले- 'सर्वांचे समर्थन आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. आम्ही पुन्हा प्रयत्न करू. खरा प्रशिक्षक.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

SCROLL FOR NEXT