Shubman Gill IPL Record Saam TV
Sports

Shubman Gill: शुभमन गिल IPL मध्ये पहिल्यांदाच या नव्या बॅटने खेळणार; पण काय आहे खास?

Shubman Gill New Bat: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात गिल नव्या बॅटसह मैदानात उतरणार आहे.

Ankush Dhavre

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यात श्रेयस अय्यर पहिल्यांदाच पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

तर गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या सामन्यात गिल पहिल्यांदाच नव्या बॅटसह मैदानात उतणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर तो ही बॅट घेऊन मैदानात उतरला आहे. मात्र तो आयपीएलमध्ये पहिल्यांदाच या बॅटसह मैदानात उतरणार आहे. काय आहे या बॅटचं वैशिष्ट्ये? जाणून घ्या.

शुभमन गिलच्या नव्या बॅटचं वैशिष्ट्य काय?

शुभमन गिलच्या नव्या बॅटसह मैदानात उतरणार आहे. या नव्या बॅटचं वैशिष्ट्य म्हणजे, बॅट तीच असेल, पण बॅटचा लुक बदलला आहे. तुम्ही गिलला फलंदाजी करताना पाहिलं असेल, यापूर्वी तो CEAT स्टीकर असलेली बॅट घेऊन फलंदाजीला यायचा. मात्र यावेळी त्याच्या बॅटवर MRF चं स्टीकर असणार आहे. गिल पहिल्यांदाच MRFचं स्टीकर असलेली बॅट घेऊन आयपीएलमध्ये फलंदाजी करण्यासाठी येणार आहे. गिलने MRF सोबत केलेल्या करारानुसार, MRF त्याला वर्षाला ८ ते ९ कोटी रुपये देणार आहे.

गिल ही बॅट घेऊन फलंदाजीला येण्याची ही पहिलीच वेळ नसेल. या बॅटने तो २ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने १९.५० च्या सरासरीने ३९ धावा केल्या आहेत. ही बॅट घेऊन तो चॅम्पियन्स ट्रॉफीत फलंदाजीला आला होता. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. गिलचा आयपीएल स्पर्धेतील रेकॉर्ड दमदार राहिला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे.

अहमदाबादमध्ये कसा राहिलाय रेकॉर्ड?

अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्स संघाचं होम ग्राऊंड आहे. या मैदानावर खेळताना गिलचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. या मैदानावर फलंदाजी करताना त्याने ७१.९३ च्या सरासरीने आणि १६३.२३ च्या स्ट्राईक रेटने १०७९ धावा केल्या आहेत. अशीच फलंदाजी तो पंजाबविरुद्धच्या सामन्यातही करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात पाय ठेवू नये- आमदार उत्तम जानकर यांचा इशारा

Konkan Politics: कोकणात भाजपला हादरा, कणकवलीच्या नगराध्यपदी पारकर

Shubman Gill: शुभमन गिलच्या नावावर का बसली कात्री? रिपोर्टमधून सत्य कारण अखेर समोर

बांगलादेश पुन्हा पेटलं; जमावाने नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू

Hair Care: केस ड्राय होऊन गळतायतं? मग पार्लर ट्रिंटमेंटपेक्षा घरीचं करा 'हा' हेअस मास्क, एका वॉशमध्येच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT