Shubman gill fathers cant control emotions after his son scored century in india vs england 5th test cricket news in marathi  twitter
क्रीडा

Shubman Gill Father: नाव काढलंस पोरा..गिलच्या शतकी खेळीनंतर वडिलांची खास रिॲक्शन व्हायरल

Ankush Dhavre

Shubman Gill Father Reaction On Century:

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शुभमन गिलने शतक झळकावलं आहे. त्याने १३७ चेंडूंचा सामना करत त्याने १० चौकार आणि ५ षटकांरांच्या साहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. एकीकडे गिलच्या शतकी खेळीने इंग्लंडच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. तर दुसरीकडे मुलाने साकारलेली शतकी खेळी पाहून गिलच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

हा सामना पाहण्यासाठी गिलच्या वडिलांनी देखील मैदानावर हजेरी लावली होती. मुलाने शतक झळकावल्यानंतर बॅट हवेत उचलताच स्टँड्समध्ये सामना पाहत असलेल्या गिलच्या वडिलांची छाती अभिमानाने फुलली. गिलच्या वडिलांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर नेटकरीही कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत.

या मालिकेतील दुसरं शतक...

एक वेळ अशी आली होती जेव्हा गिलला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरु लागली होती. मात्र विशाखापट्टनममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत गिलने शानदार शतकी खेळी साकारली आणि टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या सामन्यात त्याने १०४ धावांची खेळी केली. तर राजकोट कसोटीत तो ९१ धावांवर बाद झाला होता. मालिकेतील चौथ्या कसोटीतही त्याने ३८ आणि ५२ धावांची तुफान खेळी केली. (Cricket news in marathi)

अशी राहिलीये कारकिर्द..

शुभमन गिलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २५ सामन्यातील ४६ डावांत ३६.१७ च्या सरासरीने १४८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली आहेत. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT