shubman gill saam tv
Sports

Shubman Gill: शतकी खेळीनंतर शुभमन गिलचं मोठं वक्तव्य! ''ज्या षटकात मी ३ षटकार मारले..."

Shubman Gill Statement After Century: या सामन्यानंतर त्याने आपल्या खेळीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

GT VS MI, IPL 2023: अहमदाबादच्या मैदानावर आक्रमक फलंदाज शुभमन गिलने तुफान फटकेबाजी केली. शनिवारी क्वालिफायर २ च्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २३३ धावांचा डोंगर उभारला होता. गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली. या सामन्यानंतर त्याने आपल्या खेळीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर त्याने म्हटले की, 'गेल्या वेस्टइंडिज दौऱ्यानंतर मी माझ्या खेळात भरपूर बदल केला आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामानंतर मी माझ्या खेळावर काम करायला सुरुवात केली. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मालिकेत मी टेकनिकमध्ये काही बदल केले होते. आज केलेली खेळी ,माझ्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही मैदानाबाहेर असता तेव्हा अपेक्षांचा विचार करता, मात्र मैदानात असताना तुम्ही केवळ संघाला विजय कसा मिळवून देता येईल याचा विचार करता. मी प्रत्येक चेंडू, प्रत्येक षटकाचा विचार करत असतो. ज्यावेळी मी ३ षटकार मारले, त्यावेळी मला जाणवलं की आज माझाच दिवस आहे.

हा विकेट फलंदाजी करण्यासाठी अनुकूल होता. मी फलंदाजीत नेहमीच काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो. नुकताच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. मला विश्वास होता की, आयपीएल २०२३ स्पर्धेत देखील चांगली कामगिरी करेल.' (Latest sports updates)

गुजरातचा जोरदार विजय

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ६० चेंडुचा सामना करत १२९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १० गगनचुंबी षटकार मारले.

तसेच साई सुदर्शनने ४३ धावांची विस्फोटक खेळी केली. शेवटी कर्णधार हार्दिक पंड्याने २८ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २३३ पर्यंत पोहचवली.

मुंबई इंडियन्स संघाकडून या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४३ आणि कॅमेरून ग्रीनने ३० धावांची बहुमूल्य खेळी केली. मात्र मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात ६२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

Doctor Strike : पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर, आरोग्यसेवेवर मोठा परिणाम | VIDEO

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Women's health issues: धक्कादायक! ४०% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त; केवळ लाजेमुळे उपचारास होतोय विलंब

SCROLL FOR NEXT