IPL 2021 Twitter/@DC
Sports

IPL 2021: दिल्लीसाठी खूषखबर! दिग्गज खेळाडूचं संघात होेणार पुनरागमन?

आयपीएलचा (IPL 2021) दुसरा टप्पा 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे.

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) दुसर्‍या टप्प्यातील तारखा जाहिर झाल्या आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) एक चांगली बातमी समोर आली आहे. त्यांचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyash Iyer) 4 महिन्यांच्या दुखापतीनंतर पुन्हा नेटमध्ये सराव करण्यासाठी आला आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार अय्यरने भारताचे माजी फलंदाज आणि दिल्ली कॅपिटलचे फलंदाजी प्रशिक्षक प्रविण आमरे (Pravin Amre ) यांच्याबरोबर सराव सुरू केला आहे. अय्यर ला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून (NCA) फिटनेस प्रमाणपत्र मिळालेले नाही. सामना खेळण्यापूर्वी हे प्रमाणपत्र आवश्यक असेल.

अहवालानुसार, अय्यर 31 जुलैपर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी सुविधेत प्रशिक्षण घेईल आणि महिन्याच्या अखेरीस राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला रिपोर्ट करेल. “तो मुख्यत: इंडोर सराव करत आहे. कारण मैदानात सराव करण्याची त्याला परवानगी नाहीये. मुंबईतही पाऊस पडला आहे. असे फ्रँचायझीच्या स्रोताने माध्यामांना सांगितले.

आयपीएलचा दुसरा टप्पा 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे. दिल्ली फ्रँचायझीला विश्वास आहे की यापूर्वी अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त असेल आणि सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल. दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्जने बीसीसीआयकडे 20 ऑगस्टपूर्वी दुबईला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे.

बीसीसीआयने जाहीर केल्यानुसार, आयपीएल 2021 19 सप्टेंबरपासून दुबईमध्ये पुन्हा सुरू होणार आहे. दिल्ली कॅपिटलसह इतर बहुतांश फ्रॅन्चायझींनी स्पर्धेच्या एक महिन्यापूर्वी दुबईत सराव करण्यासाठी परवानगी मागितली आहे. दिल्ली कॅपिटलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अय्यर ला 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वीची परिस्थिती समजून घेण्यास आणि पुनरागमन करण्यास मदत होईल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT