Shreyas Iyer is expected to lead India’s T20 side, while teenage batting sensation Vaibhav Suryavanshi is set for his maiden national team call-up. AI
Sports

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

India T20 squad announcement : टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला टी20 कर्णधारपद मिळू शकते, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.

Namdeo Kumbhar

Shreyas Iyer new India T20 captain : विश्वविजेत्या भारतीय टी-२० संघाबाबत एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आगामी टी-२० मालिकांसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवून, त्याच्या जागी श्रेयस अय्यरची टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

२०२८ ऑलिम्पिक आणि आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बीसीसीआयने (BCCI) हा भविष्याभिमुख निर्णय घेतल्याचे समजते. यासह आयपीएल २०२६ मध्ये आपल्या वादळी फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळणार आहे.

६ जून रोजी होणार संघाची अधिकृत घोषणा

'ईएसपीएन क्रिकइन्फो'च्या वृत्तानुसार, निवड समिती ६ जून रोजी आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. याच वेळी श्रेयस अय्यरच्या नावावर कर्णधार म्हणून अधिकृत शिक्कामोर्तब होईल, तर युवा फलंदाज तिलक वर्माकडे उपकर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे.

सूर्याला कर्णधारपदावरून का हटवले?

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकला असला, तरी अंतिम ११ खेळाडूंमधील त्याचे स्थान आणि वैयक्तिक कामगिरीवर सातत्याने टीका होत होती. त्यामुळेच निवड समितीने भविष्याचा विचार करून सूर्याऐवजी श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरने शेवटचा टी-२० सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता. २०२६ च्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राखीव खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता थेट कर्णधार म्हणून त्याचे संघात पुनरागमन होत आहे.

'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 'ऑरेंज कॅप' जिंकणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या निवडीची क्रिकेट जगतात जोरदार चर्चा होती. अखेर निवड समितीने त्याला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकरनंतर भारतीय संघात स्थान मिळवणारा वैभव हा दुसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरणार आहे.

भारताच्या आगामी दौऱ्यांचे वेळापत्रक:

आयर्लंड दौरा: भारतीय संघ जून महिन्याच्या अखेरीस आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून २६ आणि २८ जून रोजी दोन टी-२० सामने खेळवले जातील.

इंग्लंड दौरा: आयर्लंडनंतर भारतीय संघ जुलैच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध १ ते ११ जुलै दरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT