Shreyas Iyer Record in World Cup 2023 Saam Tv
Sports

Shreyas Iyer Record: व्वा अय्यर भाई व्वा! फक्त २५ धावा केल्या, तरी मोडला विक्रम; जाणून घ्या काय आहे पराक्रम

World Cup 2023 Record By Shreyas Iyer: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. यामध्ये श्रेयस अय्यरने नवा विक्रम रचला आहे.

Bharat Jadhav

World Cup 2023 Shreyas Iyer:

आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला असून खेळाडूंनी दमदार खेळी केली आहे. खेळांडूचा फॉर्म पाहून पुढील सामन्यातही ते जबरदस्त खेळी करतील यात शंका नाही. (Latest News)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुलने अप्रतिम खेळी खेळली. तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अशी धुव्वाधार फलंदाजी केली की सर्व जग बघतच राहिले. दरम्यान या सामन्यात इशान किशन, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनीही उत्कृष्ट फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने फक्त २५ धावा केल्या. पण त्याने जरी २५ धावा केल्या असल्या तरी त्याने विक्रम रचला आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले आणि अनेक विक्रम मोडले. इशान किशननेही ४७ चेंडूत ४७ धावांची दमदार खेळी केली होती. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने ५६ चेंडूत ५५ धावा केल्या. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरने २३ चेंडूत २५ धावा केल्या.

यामध्ये १ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. पण हा एक षटकार मारताच श्रेयस अय्यरने नवा विक्रम रचला. त्याचा षटकार १०१ मीटर अंतराचा होता. जो यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात लांब षटकार होता. विशेष म्हणजे या सामन्यात काही वेळापूर्वी रोहित शर्माने ९३ मीटर लांब षटकार ठोकला होता. मात्र श्रेयस अय्यरने त्याच्या कर्णधाराचा विक्रम मोडला.

वनडे वर्ल्ड कप २०२३ मधील सर्वात लांब षटकार मारण्यामध्ये श्रेयस अय्यर पहिल्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा ९३ मीटरचा षटकार ठोकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅनसेनने ८९ मीटर लांबचा षटकार ठोकत तिसऱ्या स्थानी आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत तो सर्वात लांब षटकार मारण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता, मात्र आता तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

SCROLL FOR NEXT