आयपीएल २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ही स्पर्धा तोंडावर असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसू शकतो. सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्याने विदर्भविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी केली. मात्र त्याला वेदना होत असल्याचं जाणवलं.
विदर्भ संघाविरुद्ध सुरु असलेल्या फायनलमध्ये श्रेयस अय्यरने चौथ्या दिवशी ९५ धावांची खेळी केली. माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा पाठीच्या दुखण्याचा त्रास होतोय. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या हंगामातही दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं. यावेळी तो सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, टाईम्स ऑफ इंडियाच्या एका सुत्राच्या हवाल्याने असं सांगण्यात येत आहे की, श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफीच्या पाचव्या दिवशी खेळताना दिसून येण्याची शक्यता खूप कमी आहे. यासह तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो.
या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, रणजी ट्रॉफी फायनलच्या चौथ्या दिवशी त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान फलंदाजी करत असताना त्याला पाठीत वेदना देखील जाणवत होत्या. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही? यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. (Cricket news in marathi)
कोण होणार कर्णधार?
आयपीएल २०२३ स्पर्धेतूनही श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यावेळी नितिश राणा संघाचा कर्णधार होता. यावेळी श्रेयस अय्यर कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. तर नितिश राणा उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे जर श्रेयस अय्यर काही सामने बाहेर राहिला तर त्याच्याऐवजी नितिश राणा संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.