pakistan cricket team SAAM TV
Sports

Shoaib Akhtar Statement: 'या मुलांना खायला,प्यायला अन् बोलायला शिकवा..', अख्तर आपल्याच खेळाडूंवर भडकला

Shoaib Akhtar On Pakistan Cricket Team: या सामन्यानंतर शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Shoaib Akhtar On Pakistan Cricket Team:

चेन्नईच्या मैदानावर पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी या सामन्यात धुमाकूळ घालत पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे.

सलग तीन सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटरपटू शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे. त्याने चेअरमन, निवडसमितीसह संघातील खेळाडूंना खडेबोल सुनावले आहेत.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

या सामन्यानंतर झी न्यूजवर बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, 'आजचा पराभव खुप लाजिरवाणा आहे. ज्याप्रकारे पाकिस्तानी खेळाडू खेळत होते ते खुप लाजिरवाणं आहे. अफगाणिस्तान सारख्या संघाकडून पराभूत होणं, याहून वाईट आणखी काय असू शकतं'

तसेच तो पुढे म्हणाला की,' पाकिस्तानचा हा संघ कुठल्याही पाकिस्तानीला प्रेरणा देत नाही. पााकिस्तानच्या तरूणांना प्रेरणा देईल असा एकही खेळाडू या संघात नाही. पाकिस्तानमधील लोकांना याच गोष्टीचा प्रचंड राग आहे.'

'या मुलांना शिकवण्यासाठी कोणीच नाही. ना चेअरमन आहे ना कोचिंग करण्यासाठी जबाबदार व्यक्ती. यांच्याकडे असा एकही क्रिकेटपटू नाही जो यांना खायला, प्यायला आणि बोलायला शिकवेल आणि यांचा उत्साह वाढवेल. संघात असा जबाबदार व्यक्ती असणं गरजेचं आहे जो यांना सोबत घेऊन चालेल आणि यांना हिरो बनवेल.' (Latest sports updates)

पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव..

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या तीन सामान्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोमवारी चेन्नईच्या मैदानावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT