SHIKHAR DHAWAN TWITTER
क्रीडा

Shikhar Dhawan चा 'लड्डू मुत्त्या बाबा' अवतार! Video पाहून पोट धरुन हसाल

Shikhar Dhawan Viral Video: भारताचा माजी फलंदाज शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Shikhar Dhawan Laddu Muthya: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदज शिखर धवनने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर तो टी-२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून आला होता.

या स्पर्धेत त्याची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली होती. दरम्यान आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत असणारा शिखर धवन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो आपल्या सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या तुफान व्हायरल होतोय.

गेल्या काही दिवसांपासून, सोशल मीडिया उघडलं की एकच बाबाचा व्हिडिओ दिसतो. तो बाबा म्हणजे लड्डू मुत्त्या बाबा. दोन लोकं या बाबाला उचलतात आणि हा बाब वेगाने फिरत असलेला पंखा हातांच्या बोटांनी थांबवतो.

त्यानंतर लोकांच्या माथ्यावर हात लावून शुभेच्छा देतो. अनेकांना हा चमत्कार वाटतो. त्यामुळे या बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची रांगच रांग लागते. या बाबाचे रिल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान शिखर धवननेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन लड्डू मुत्त्या गाण्यावरील एक रिल बनवून शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्य तुम्ही पाहू शकता की, शिखर धवन एका रुममध्ये खुर्चीवर बसल्याचं दिसून येत आहे. त्यावेळी त्याच्यासोबत असलेले २ लोकं त्याला उचलून घेतात. दोघेही शिखरला हवेत उचलतात आणि मग शिखर फिरत असलेला पंखा हाताने थांबवतो. पंखा थांबवून आपल्या सोबत असलेल्या लोकांना आशीर्वाद देतो. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

शिखर धवनने शेअर केलेल्या या व्हिडिओवर आतापर्यंत २.३ मिलियन लोकांनी लाईक केलं आहे. यासह नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका युजरने लिहिले, 'क्रिकेटला रामराम केल्यानंतर आता बाबा बना..' तर एका युजरने लिहिले, ' गब्बर इज बॅक नाही, तर बाबा इज बॅक..' या व्हिडिओवर नेटकरी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT