Maharashtra Kesari
Maharashtra Kesari Saam Tv
क्रीडा | IPL

Maharashtra Kesari: साहेबराव पवार, (कै) जाधव कुटुंबाचा वाद मिटवू : शंभूराज देसाई

साम न्यूज नेटवर्क

सातारा : पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेदीचे वृत्त विविध प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेद दूर करण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती (maharashtra kesari kusti) स्पर्धेनंतर जिल्हा तालीम संघाचा एक विश्वस्त व शासनाचा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी दिली. (maharashtra kesari kusti latest marathi news)

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व जिल्हा तालीम संघ सातारा (satara) यांच्या सहकार्याने येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) कुस्ती (wrestling) स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा उत्साहात सुरु आहे. दरम्यान या स्पर्धेच्या आयाेजनावरुन सध्या साहेबराव पवार आणि नामवंत मल्ल (कै.) श्रीरंग जाधव यांच्या कुटुंबियांमध्ये उभा वाद निर्माण झाला. त्यातून जाधव कुटुंबियांनी पवार कुटुंबियांवर एककल्ली कारभाराचे नुकतेच आराेप केले.

या पार्श्वभुमीवर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लवकरच दाेन्ही कुटुंबियांची बैठक घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. ते म्हणाले जिल्हा तालीम संघाची स्थापना करण्यात लोकनेते बाळासाहेब देसाई, (कै.) प्रतापसिंहराजे भोसले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण, (कै.) पैलवान श्रीरंग जाधव, साहेबराव पवार यांच्यासह तत्कालीन पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेद दूर करण्यासाठी जिल्हा तालीम संघाचा एक विश्वस्त व शासनाचा प्रतिनिधी म्हणून लवकरच बैठक घेईन.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Skin : महागड्या पावडर शिवाय गावच्या मुली नक्षत्रासारख्या सुंदर कशा दिसतात? वाचा सौंदर्याचं रहस्य

Olive Ridley Turtle Conservation: कोकणात कासव संवर्धन मोहिमेला तापमानवाढीचा फटका, 50 टक्के पिल्लांची संख्या घटली

KL Rahul Statement: लखनऊच्या कामगिरीवर केएल राहुल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून कांद्याच्या माळा घालून केंद्राचा निषेध

Maharashtra Monsoon Update: मान्सूनची आनंदवार्ता, उकाड्यापासून मिळणार दिलासा; 'या' तारखेपर्यंत राज्यात मान्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT