shahid afridi  saam tv
Sports

Shahid Afridi Viral Video: एवढी वर्ष खेळला, ४५० विकेट्स घेतल्या, तरीही आफ्रिदीला LBW चा फुलफॉर्म माहीत नाही; पाहा VIDEO

Shahid Afridi LBW Story: वाचा शाहिद आफ्रिदीचा मजेशीर किस्सा.

Ankush Dhavre

Shahid Afridi LBW Video:

शाहिद आफ्रिदी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. या खेळाडूने ५२४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २ वेळा निवृत्ती जाहिर केली आहे. तर गोलंदाजी करताना या गोलंदाजाने ४५० हुन अधिक गडी बाद केले आहेत.

आता इतका अनुभव असलेल्या गोलंदाजाला क्रिकेट खेळातील बारीक सारीक गोष्टी खुप चांगल्याने माहीत असतील असं तुम्हालाही वाटत असेल. मात्र शाहिद आफ्रिदीला साधा LBW चा फुलफॉर्म माहित नाही. हे तुम्हाला ऐकायला विचित्र वाटत असलं तरिदेखील हे खरं आहे.

शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे ज्यात तो एका शोमध्ये असल्याचे दिसून येत आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या वृत्तवाहीनीवरील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला एक गेम खेळण्यास सांगण्यात आले होते.

हा गेम असा होता की, ओठांच्या हालचालींवरून समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे ओळखायचं होतं. त्याने कानात हेडफोन्स लावले होते आणि मोठ्या आवाजात गाणं वाजवलं गेलं होतं. त्याला ओठांच्या हालचालींवरून जे ओळखायचं होतं तो LBW असा शब्द होता.

शाहिद आफ्रिदीला आपण काय बोलतोय हे शो प्रेझेंटरने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व शाहिद आफ्रिदीच्या डोक्यावरून गेलं. त्याने लेग आणि बिफोर तर ओळखलं मात्र विकेट हा शब्द त्याला ओळखता येत नव्हता.

हेडफोन्स काढल्यानंतर शो प्रेझेंटरने त्याला सांगितलं की, शेवटचा शब्द विकेट असा होता. मात्र पुढे जे झालं ते पाहून तु्म्हाला हसु आवरणार नाही. (Latest sports updates)

LBW काय शाहिद आफ्रिदीलाच माहीत नाही...

शाहिद आफ्रिदीने म्हटले की, LBW काय असतं? ही क्रिकेटची कोणती भाषा आहे. मी पहिल्यांदाच Leg Before Wicket ऐकतोय. इतकंच नव्हे तर त्याने शो प्रेझेंटरला सांगितलं की,कदाचित त्यांना हिट विकेट असं म्हणायचं असेल. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT