letter in Abhishek Sharma saam tv
Sports

IPL 2025: अभिषेक शर्माच्या खिशातील 'त्या' चिठ्ठीमागचं रहस्य काय? सामन्यानंतर स्वतः केला खुलासा; म्हणाला, माझ्या मनात आलं की...!

SRH vs PBKS: शनिवारी आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने एका खास पद्धतीने सेलीब्रेशन केलं.

Surabhi Jayashree Jagdish

शनिवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जला धूळ चारली. या सामन्यात हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्माने १४१ रन्सची ऐतिहासिक खेळी खेळली. त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत पहिल्या विकेटसाठी १७१ रन्सची पार्टनरशीप केली. ज्यामुळे २४६ रन्सचं आव्हान गाठणं सोपं झालं. या सामन्यात अभिषेकने शतक पूर्ण केलं तेव्हा त्याने एका खास पद्धतीने सेलिब्रेशन केलं. त्याने कागदाची एक चिठ्ठी काढली आणि सर्वांना दाखवली.

अभिषेक शर्माने ४० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. सनरायझर्स हैदराबादसाठी हे दुसरं सर्वात जलद शतक होतं. याआधी ट्रॅव्हिस हेडने ३९ बॉल्समध्ये शतक झळकावलं होतं. अभिषेक शर्माने शतक झळकावलं आणि खिशातून एका चिठ्ठी काढली. या चिठ्ठीवर लिहिलं होतं की, हे ऑरेंज आर्मीसाठी आहे (This One is For Orange Army) . याचा अर्थ अभिषेक शर्माने त्याचं हे ऐतिहासिक शतक त्याच्या चाहत्यांना समर्पित केलं.

सामन्यानंतर काय म्हणाला अभिषेक?

सामन्यानंतर अभिषेकने त्याच्या या स्पेशल सेलिब्रेशन संदर्भात सांगितलं. तो म्हणाला की, "मी हे स्वतः लिहिलंय कारण मी सहसा सकाळी उठतो आणि काहीतरी लिहितो. आज माझ्या मनात आलं की, जर मी आज चांगला खेळलो तर मी ऑरेंज आर्मीला समर्पित करेन. आज मला वाटलं की हा माझा दिवस आहे."

श्रेयस अय्यरनेही पाहिली चिठ्ठी

अभिषेकच्या सेलिब्रेशननंतर, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्याकडे आला आणि चिठ्टीवर काय लिहिलंय हे पाहिलं. अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ रन्सची ऐतिहासिक खेळी केली. या डावात त्याने १० सिक्स आणि १४ चौकार मारले. आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजाने खेळलेली ही सर्वात मोठी वैयक्तिक खेळी होती.

इतर खेळाडूंचे मानले आभार

सामना संपल्यानंतर अभिषेक शर्माने कर्णधार आणि टीममधील इतर खेळाडूंचे आभार मानले. अभिषेक म्हणाला, गेल्या ४ सामन्यांमध्ये फलंदाज चांगली कामगिरी करत नव्हते पण तरीही टीममधील वातावरण चांगलं होतं. माझे आईवडील आज स्टेडियममध्ये आले होते. मी त्यांची वाट पाहत होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली, तिघे गंभीर जखमी

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT