team india twitter
क्रीडा

Team India News: सरफराज खानला संधी मिळणं कठीण! 2863 रन्स करणाऱ्या या फलंदाजाला मिळणार स्थान

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणारी कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नईत रंगणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात केएल राहुल कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. रोहित शर्मा त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी देऊ शकतो.

केएल राहुल हा भारतीय संघातील अनुभवी फलंदाज आहे. मात्र गेल्या २ वर्षांपासून तो संघाबाहेर आहे. तो बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. त्यानंतर याच वर्षी जानेवारीमध्ये तो दुखापग्रस्त झाला होता.

ज्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थान गमवावंन लागलं होतं. मात्र आयपीएल स्पर्धेतून कमबॅक केलं. आता दुलीप ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे.

राहुल की सरफराज?

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की,' केएल राहुलचा अनुभव पाहता त्याला सरफराज आधी प्राधान्य दिले जाऊ शकते. सरफराज खानला १५ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

त्याने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली होती. तर केएल राहुल बदल बोलायचं झालं तर, त्याने दक्षिण आफ्रिकेविरूध्द खेळताना शतक आणि आपल्या शेवटच्या कसोटीत ८६ धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे केएल राहुलला संधी मिळण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय संघाचं विशेष लक्ष डिसेंबरमध्ये होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर असणार आहे. बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडविरुध्द कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. परदेशात खेळताना केएल राहुलचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याला संघात स्थान देऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT