Sarfaraj Khan  Saamtv
Sports

Sarafraj Khan: निवड समितीने फसवले! संघात निवड न झाल्याने सर्फराज खानची नाराजी, म्हणाला; 'मला शब्द दिला होता....'

मुंबई संघाकडून रणजी सामने खेळणारा हा युवा खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मात्र तरीही त्याला संघात संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Gangappa Pujari

Mumbai: बीसीसीआयकडून नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. संघ घोषित करण्यात आल्यानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती सर्फराज खानच्या नावची. मुंबई संघाकडून रणजी सामने खेळणारा हा युवा खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मात्र तरीही त्याला संघात संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्वतः सरफराजने त्याच्या संघातील निवडीबद्दल मोठा खुलासा करत बीसीसीआयने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड न झाल्याबद्दल सर्फराज खानने नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, निवडकर्त्यांकडून त्याला बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यांसाठी संघात संधी मिळेल असा शब्द देण्यात आला होता. मात्र त्याला संधी देण्यात आली नाही.

याबद्दल बोलताना तो म्हणाला की, "बंगळूरविरुद्द रणजी सामन्यात मी शतक ठोकले होते. यानंतर मी निवडकर्त्यांना भेटलो. तेव्हा मला तुला बांग्लादेशविरुद्ध (bangladesh) संधी मिळेल, तयार रहा असे सांगण्यात आले होते. त्यानंतर मी पुन्हा हॉटेलमध्ये चेकइन करत असताना चेतन शर्मा सरांना भेटलो. त्यांनीही मला निराश होऊ नकोस, तुझी वेळ येईल, असे सांगितले."

पुढे बोलताना तो म्हणाला की, "शब्द देवूनही मला वगळण्यात आले. तेव्हा मला खूप वाईट वाटले. संघ जाहीर झाल्यानंतर मी खूप उदास झालो होतो. असे का झाले असेल, याचाच मी दिवसभर विचार करत होतो. माझ्या जागी दुसरे कोणीही असते तरी त्यालाही वाईट वाटले असते. कारण माझी संघात निवड होईल, अशी मला अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही."

दरम्यान, सर्फराज खान मुंबईकडून (Mumbai) रणजी सामने खेळतो. ज्यामध्ये त्याचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT