Viral Video : लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने त्यांच्या यूव्ही कॅन फाउंडेशनच्याद्वारे कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी निधी उभारण्यासाठी लंडनमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज हजर होते. सचिन तेंडुलकर, त्यांची पत्नी आणि मुलगी या कार्यक्रमात उपस्थित होते. याशिवाय भारतीय कसोटी संघाला देखील कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते.
लंडनमधील कार्यक्रमातला नवा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा तेंडुलकर मागे वळून शुभमन गिलकडे पाहत असल्याचे दिसते. कार्यक्रमामध्ये सारा तिचे आईवडील, सचिन आणि अंजली तेंडुलकर यांच्यासोबत बसलेली असते. दुसऱ्या बाजूला बसलेल्या शुभमन गिलला ती मागे वळून पाहते. त्यावेळेस गिल हा युवराज सिंहची पत्नी हेझल कीचशी बोलत असतो.
काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला होता. शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंत असे भारतीय संघातील खेळाडू एका टेबलवर बसल्याचे व्हिडीओत दिसते. या टेबलाच्या लगत असलेल्या टेबलावर सचिन तेंडुलकर, त्यांची पत्नी अंजली आणि लेक सारा बसलेले असतात. साराकडे पाहून रवींद्र जडेजा शुभमन गिलला चिडवत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील नात्याबाबत बऱ्याच काळापासून चर्चा रंगत आहेत. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्समधून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लंडनमधील एका कार्यक्रमात दोघेही उपस्थित असल्याचे समोर आल्यानंतर ही चर्चा पुन्हा एकदा चांगलीच सुरु झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.