Sanju samson Twitter
Sports

WATCH IPL 2023: Sanju Samson ने टिपला IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल! पाहा व्हिडिओ - VIDEO

Sanju Samson Catch Video : राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने एक भन्नाट झेल टिपला आहे

Ankush Dhavre

RR VS DC IPL 2023 MATCH: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ११ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी बाद १९९ धावा केल्या आहेत.

दरम्यान या धावांचा बचाव करत असताना राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन हा सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक भन्नाट झेल टिपले आहेत. आता या यादीत आणखी एका झेलचा समावेश झाला आहे. (Sanju Samson Catch Against DC)

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांची जोडी मैदानात आली होती. मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. पहिले षटक टाकण्यासाठी ट्रेंट बोल्ट गोलंदाजीला आला होता. त्याने तिसऱ्याच चेंडू यॉर्कर चेंडू टाकला. हा चेंडू बॅटची कडा घेत थेट संजू सॅमसनच्या हातात गेला. चेंडू लांब असूनही संजू सॅमसन डाईव्ह मारत टिपला. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ६० आणि शिमरन हेटमायरने ३० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने २० षटक अखेर १९९ धावांचा डोंगर उभारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT