sanju samson google
Sports

Asia Cup 2025: आशिया कपआधी भारताला मोठा धक्का, महत्वाच्या खेळाडूला दुखापत; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Sanju Samson Got Injured Before Asia Cup: दोन दिवसात आशिया कपला सुरुवात होणार आहे, त्याआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. संघातील महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अवघ्या दोन दिवसात आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया ४ सप्टेंबर रोजी यूएईला रवाना झाली. टीम इंडियाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईशी खेळला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनबद्दल वाईट बातमी येत आहे. खरंतर, असे म्हटले जात आहे की, संजूला सराव दरम्यान दुखापत झाली आहे आणि तो पूर्णपणे फिट नाही. संजूचे काही फोटो सोशल मीडियावरही समोर आले आहेत, ज्यामध्ये तो खूप अस्वस्थ दिसत आहे.

तर दुसरीकडे, जितेश शर्मा जोमाने विकेटकीपिंगचा सराव करताना दिसला. ज्यामुळे संजूच्या दुखापतीची शक्यता आणखी वाढली आहे. मात्र, संजूला कोणती दुखापत झाली आहे की नाही आणि तो टीम इंडियासाठी आशिया कपमधील पहिला सामना खेळणार आहे की नाही याबद्दल कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.

आशिया कपआधी संजू सॅमसनला दुखापत

रेव्हस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू नेटमध्ये सराव करत असताना, सॅमसन फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांच्यापासून दूर सराव करत होता. वृत्तानुसार, सॅमसनने कोटक यांच्याशी काही वेळ चर्चा केली आणि नंतर थ्रो-डाऊन करायला सुरुवात केली. सॅमसन प्रशिक्षकांपासून दूर जात असताना, त्याच्या उजव्या पायात काही त्रास होत होता आणि तो लंगडत चालत होता. त्याला वेदनाही होत असल्याचे दिसून आले. कोटक यांनी थ्रो-डाऊन सुरू केले तेव्हा सॅमसन ज्या पद्धतीने शॉट्स खेळत होता, त्यावरून त्याला त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.

पहिल्या सामन्यापर्यंत संजू फिट होणार ?

संजू सॅमसन हा गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममद्ये आहे, म्हणून त्याचे फिटनेस हे संघासाठी देखील ताणावाचा विषय आहे. अलिकडेच,या ३० वर्षीय खेळाडूने गेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत. केरळ क्रिकेट लीगमध्ये त्याने ५ डावात ३० षटकार मारले. याआधी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये त्याच्या स्थानाबद्दल निश्चितच प्रश्न होते. पण, शुभमन गिल संघात परतल्यामुळे संजू सलामीसाठी येणार का? की, अभिषेक शर्माला संघाबाहेर बसावे लागेल, याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या शुभमन गिलच्या संघात पुनरागमनामुळे त्याचे अकरामधील स्थान संशयाच्या भोवऱ्यात आहे.

आशिया कप २०२५ गट

आशिया कप २०२५ मध्ये एकूण ८ संघ सहभागी होत आहेत, यामध्ये अ आणि ब अशा दोन गटात संघ विभागले गेले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान आहेत. तर, ब गटात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत. आशिया कपच हा फॉरमॅट टी-२० स्वरूपात खेळवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासदाराच्या बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट, नंतर सासऱ्यानं भररस्त्यावर काठीनं मारलं; व्हिडिओ व्हायरल

Raigad Politics: आदिती तटकरे-भरत गोगावले खुर्चीला खुर्ची लावून बसले, कानात कुजबुजले, पालकमंत्रिपदाचा वाद मिटला?

Maharashtra Live News Update: 'सगेसोयरे' जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात ओबीसी संघटना आक्रमक

Buldhana : शेतातून घरी परतत असताना दुर्दैवी अंत; नदीत पाय घसरून तरुणाचा बुडून मृत्यू

कोल्हापूर गॅझेटची आरक्षणाच्या लढाईत एन्ट्री; मराठा-कुणबी समाज एकच असल्याचा ऐतिहासिक उल्लेख|VIDEO

SCROLL FOR NEXT