माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांचे १४ वर्षे जुने वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. दोघांना पाच वर्षांचा मुलगाही असून तो सानिया मिर्झासोबत राहतो. दोघांनी २०१०मध्ये लग्न केले. सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी सांगितले की, सानियाने 'खुला' घेतला आहे आणि शोएबपासून वेगळे झाली आहे. (Latest News)
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने २०१० मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी १४ वर्ष एकमेकांसोबत संसार केला. परंतु शोएब मलिकने तिसरं लग्न केल्याने त्यांचा संसार तुटलाय. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. शोएबने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून लग्नाची माहिती दिली. यानंतर सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पुष्टी केली की, सानियाने खुला स्वीकारली असून ती शोएबपासून विभक्त झाली आहे. खुला हा शब्द नव्याने ऐकल्याने इंटरनेटवर खुला आणि तलाक म्हणजे काय? या दोघात काय फरक याचे उत्तर शोधले जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय आहे खुला करण्याची प्रथा
'तलाक' आणि 'खुला' यात फारसा फरक नाही. इस्लामिक मान्यतेनुसार जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्याला 'खुला' म्हणतात. त्याच जागेवर जेव्हा पती हा निर्णय घेतो तेव्हा त्याला 'तलाक' म्हणतात. घटस्फोटानंतर ही महिला सतत ३ महिने पतीच्या घरी राहते. मात्र 'खुला' घेतल्यानंतर महिलेला पतीचे घर त्वरित सोडावे लागते. कुराण आणि हदीसमध्ये खुलाचा उल्लेख आढळतो.
खुल्याबाबत आणखी एक गोष्ट म्हणजे ती स्त्री तिच्या पतीला सांगते की, तिला खुला घ्यायचा आहे आणि पती त्याला सहमत असेल खुला होता. पण जर पतीने नकार दिला तर ती स्त्री काझीकडे जाऊ शकते आणि तो खुला मागू शकते. तिला खुला का हवा याचं कारण देऊ ती खुला घेऊ शकते. यानंतर कारणे जाणून घेतल्यानंतर काझी हे खुला देत असतात. इस्लाम धर्मात काझींना जोडप्याचं संबंध संपवण्याचा अधिकार आहे. यानंतर हे नाते संपुष्टात येते. खुला घेतल्यावर महिलेला 'मेहर' परत करावा लागतो, मात्र यामध्ये कोणतेही सुविधाही देण्यात आली आहे.
खुलानंतर घेतल्यानंतर स्त्री करू शकते दुसरं लग्न
'खुला' दिल्यानंतर महिला तिच्या इच्छेनुसार निकाह करू शकते. यासाठी तिला एक महिना प्रतीक्षता करावी लागते. खुला दिल्याच्या तारखेपासून तिला एक महिना थांबल्यानंतर ती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू शकते. खुलामध्ये तलाक नसतो, त्यामुळे ती महिला परत आपल्या पतीसोबत दुसऱ्यांदा लग्न करून त्यांच्यासोबत परत राहू शकते. दरम्यान इंडियन पसर्नल लॉच्या अंतर्गत खुलामध्ये एक तलाक गणले जाते. भारतातील मुस्लीम महिला खुला देते त्यावेळी ती तिला त्याच्यापासून तलाक हवा असं लिहून घेत असते.
पुरुष कसे तलाक घेऊ शकतात?
कुराणनुसार, तलाक-ए-हसनला इस्लाममध्ये मान्य केलं गेलं आहे. तीन महिन्यात तीनवेळा तलाक-तलाक म्हणावे लागते. यात तीन हैज म्हणजेच मासिक धर्माच इद्दत असते. हैज , दारूच्या नशेत किंवा रागा तलाक तलाक म्हटलं तर त्याला मान्य केलं जात नाही. तर इद्दतची कालावधी संपेपर्यंत तलाक वापस घेता येते. या प्रक्रियेत घटस्फोटीत पती आणि पत्नी परत लग्न करू शकतात.
जर ते दोघे तीन महिन्याच्या आत एकमेकांना समजून घेत तलाक मागे घेऊ शकतात. इद्दतच्या तीन महिन्यांनंतर पती-पत्नी दोघेही एकत्र राहत नसतील. पण काही महिन्यांनंतर पुन्हा पती-पत्नी म्हणून त्यांना एकत्र राहायचे असेल, तर ते नवीन निकाह आणि नवीन मेहर (हुंडा ) घेऊन पुन्हा विवाह करू शकतात. एका महिलेला तीनदा मेहर (हुंडा ) घेत आणि नव्या निकाह घेऊन तीनदा लग्न करू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.