sachin tendulkar viral video
sachin tendulkar viral video twitter
क्रीडा | IPL

Sachin Tendulkar: रस्ता बनला पिच, डब्ब्यांचा केला स्टम्प; अन् काश्मीरमध्ये मास्टर ब्लास्टरची तुफान फटकेबाजी- Video

Ankush Dhavre

Sachin Tendulkar Playing Cricket In Kashmir:

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन १० वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो क्रिकेट खेळताना दिसून येत असतो. सध्या तो व्हॅकेशनसाठी काश्मीरला गेला होता. यादरम्यान प्रवास करत असताना त्याने गाडी थांबवून स्थानिक खेळाडूंसह क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्रिकेट-काश्मीर अन् स्वर्गात सामना..

काश्मीरमध्ये क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडिओ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने क्रिकेट-काश्मीर अन् स्वर्गात सामना..असं लिहिलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक क्रिकेट खेळत असतात त्यांना खेळताना पाहून सचिनला क्रिकेट खेळण्याचा मोह आवरत नाही. त्यांना खेळताना पाहून सचिन तेंडुलकर आपल्या कारमधुन उतरतो. डब्ब्यांचा स्टम्प आणि रस्त्यावर सुरु असलेलं क्रिकेट पाहून सचिन त्यांना स्वत: जाऊन क्रिकेट खेळण्याबाबत विचारतो. क्रिकेटचा देव जेव्हा स्वत: क्रिकेट खेळण्याबाबत विचारतो, त्याला कोण नकार देणार आहे. (Cricket news in marathi)

सरळ आणि उलट्या बॅटनेही केली फलंदाजी...

सचिन बॅट हातात घेतो आणि विचारतो की, तुमचा मेन बॉलर कोण आहे? आणि फलंदाजी करायला सुरुवात करतो. आपल्या फलंदाजीदरम्यान तो स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह मारताना दिसतोय. शेवटच्या चेंडूवर तो उलट्या बॅटनेही शॉट मारतो. त्याला कुठलाही गोलंदाज बाद करु शकत नाही. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा देखील असल्याचं दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report: दक्षिण मुंबईत कोणत्या शिवसेनेचा विजय होईल? कोणाजी ताकद जास्त?

Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Summer Travel Tips: उन्हाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी बॅगेत ठेवायला विसरु नका; ऐनवेळी सापडाल अडचणीत

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

SCROLL FOR NEXT