cricket saam tv
Sports

IMLT20: सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या मुलांना इंटरनॅशनल मास्टर्स लीगसाठी क्रिकेट दिग्गजांसोबत मैदानावर उतरण्याची संधी

Sachin Tendulkar Foundation: इंटरनॅशनल मास्टर्स लीगसाठी क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या मुलांना दिग्गजांसोबत मैदानावर उतरण्याची संधी मिळाली.

Saam TV News

सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या (एसटीएफ) 'स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट' या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांना प्रत्यक्ष मैदानावर क्रिकेटच्या दिग्गजांना अॅक्शनमध्ये पाहण्याची अनोखी संधी मिळाली.

डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये भारत मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स या संघांसोबत ही मुले मैदानावर उतरली आणि राष्ट्रगीताचे सूर उमटत असताना सचिन तेंडुलकरच्या शेजारी उभी राहिली, त्यावेळी त्यांना वाटणारा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

इंटरनॅशनल मास्टर्स लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारत मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारत मास्टर्स संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. या सामन्यातील पहिल्या डावात भारत मास्टर्सच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करुन इंग्लंड मास्टर्स संघाला १३२ धावांवर रोखलं. या धावांचा पाठलाग करताना भारत मास्टर्स संघाने शानदार विजय मिळवला.

भारत मास्टर्स संघाचा शानदार विजय

भारत मास्टर्स संघाला या सामन्यात जिंकण्यासाठी १३३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर आणि गुरकीरतक मान यांनी दमदार सुरुवात करुन दिली. गुरकीरत मानने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर सचिन तेंडुलकरने ३४ धावा चोपल्या. तर युवराज सिंगने शेवटी२७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारत मास्टर्सने ९ गडी राखून विजय मिळवला.

भारत मास्टर्स संघाचा सलग दुसरा विजय

भारत मास्टर्स संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळ करुन दाखवला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत मास्टर्स संघाने श्रीलंका मास्टर्स संघावर शानदार विजय मिळवला होता. आता इंग्लंड मास्टर्सला पराभूत करत भारत मास्टर्सने सलग २ सामन्यांमध्ये २ विजयाची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT