Team india  Saam tv
Sports

IND VS AUS test series: 'लालसेमुळं टीम इंडियाने गमावली इंदूर कसोटी..' दिग्गजाने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं खरं कारण

या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका केली जात आहे

Ankush Dhavre

IND VS AUS Test series saba karim: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने देखील भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी भारतीय संघाबद्दल बोलताना म्हटले की, 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या हव्यासापोटी भारतीय संघाने कसोटी क्रिकेटचा आत्मा गमावला आहे. सध्या पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ एकमेकांचा सामना करतोय. जर दोन्ही संघांनी कसोटी क्रिकेट हे कसोटी क्रिकेटच्या पैलूंच्या दृष्टीने खेळले असते तर आणखी मनोरंजक वाटले असते.'

तसेच खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त करताना त्यांनी म्हटले की,' अशा प्रकारची खेळपट्टी निर्माण करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे. स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली हे अव्वल दर्जाचे फलंदाज आहेत त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते मैदानात येत असतात. त्यामुळे अशी खेळपट्टी बनवून तुम्हाला काय दाखवून द्यायचं आहे.'

भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल, तर कुठल्याही परिस्थितीत चौथा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.

हा सामना गमावलास भारतीय संघाचा अंतिम फेरीत जाण्याच मार्ग आणखी कठीण होऊ शकतो. मालिकेतील अंतिम सामना ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT