utkarsha pawar touches feet of ms dhoni  twitter
Sports

Utkarsha Pawar: शेवटी संस्कार हो! मैदानात येताच ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीने धरले धोनीचे पाय, पाहा VIDEO

Utkarsha Pawar Touches MS Dhoni's Feet: ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Utkarsha Pawar Viral Video: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपदाला गवसणी घातली आहे. या सामन्यानंतर रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.

ज्यात रिवाबा, रविंद्र जडेजाच्या पाया पडताना दिसून आली होती. या व्हिडिओनंतर आता ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू आपल्या कुटुंबातील सदस्यांसह विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये एमएस धोनी देखील असल्याचं दिसून येत आहेत. पाचव्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर संघातील खेळाडू धोनीचं अभिनंदन करताना दिसून येत आहेत. त्यानंतर उत्कर्षा येत्ते आणि धोनीला मिठी मारते. त्यानंतर त्याचे चरण देखील स्पर्श करते.

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार हे आज विवाह बंधनात अडकणार आहेत. क्रिकेट विश्वात धोनीचा मान खूप मोठा आहे. धोनीचे चरण स्पर्श करताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघाला धूळ चारत जेतेपदाला गवसणी घातली होती. (Latest sports updates)

ऋतुराज - उत्कर्षा अडकणार विवाह बंधनात..

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार हे दोघेही आज विवाह बंधनात अडकणार आहेत. शुक्रवारी या दोघांचे मेहंदी सेरेमनीतील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. उत्कर्षा पवार ही देखील क्रिकेटपटू आहे.

ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करते. २०२१ मध्ये ती आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानाजत आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Terrace Farming : सेंद्रिय पद्धतीने टेरेसवर फुलविली शेती; तळेगावातील उच्चशिक्षित महिलेचा प्रयोग

Horoscope Tuesday : अंगारकी चतुर्थीला ४ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे भविष्य

Herbal Tea : सकाळी उठल्यावर प्या 'ही' हर्बल टी, पोटाच्या समस्यांपासून होईल सुटका

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एकाच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद

Nashik politics : नाशिकमध्ये ४ मंत्री, पण ध्वजारोहणाचा मान जळगावच्या महाजनांना, पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT