Ruturaj Gaikwad Video X
Sports

Ruturaj Gaikwad : जखमी झाल्यानं ऋतुराज गायकवाड चेन्नई संघातून बाहेर पडला, आता खेळतोय फुटबॉल, पडद्यामागं काय घडतंय?

Ruturaj Gaikwad Video : राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. यामुळे तो आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला. पण याच दरम्यान त्याचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Yash Shirke

Ruturaj Gaikwad CSK Video : चेपॉक स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाचे नेतृत्त्व महेंद्रसिंह धोनी करणार आहे. ऋतुराज गायकवाड कोपराच्या फॅक्चरमुळे दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी धोनीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

कोपराच्या हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे ऋतुराज गायकवाड या पुढचे आयपीएल २०२५ मधले सामने खेळणार नसल्याची माहिती काल पत्रकार परिषदेमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रमुख प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली होती. सोशल मीडियाद्वारे देखील याबाबतची घोषणा करण्यात आली. याच दरम्यान ऋतुराज गायकवाडचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये दुखापतग्रस्त ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या खेळाडूंसह फुटबॉल खेळत असल्याचे पाहायला मिळते. ऋतुराजचा हा व्हिडीओ सोसल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओच्या खाली अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने ऋतुराजला मुद्दामून ड्रॉप करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. तो दुखापतग्रस्त नाहीये. त्याला जाणूनबुजून वगळण्यात आले आहे, अशी कमेंट दुसऱ्या यूजरने केली आहे. कर्णधारपदावरुन काढून टाकण्यासाठी बहाणा केल्याचे काहीजण म्हणत आहेत.

गुवाहाटीमध्ये ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ही लढत रंगली होती. तेव्हा तुषार देशपांडेने टाकलेला बॉल जोरात ऋतुराजच्या उजव्या हाताच्या कोपरावर आदळला होता. यामुळे तो दुखापतग्रस्त झाल्याचे म्हटले जात आहे. पण ऋतुराजचा फॅटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT